यवतमाळ शैक्षणिक

भारती महाविद्यालय येथे विविध फुलांच्या रांगोळी स्पर्धेची कार्यशाळा संपन्न

भारती महाविद्यालय येथे विविध फुलांच्या रांगोळी स्पर्धेची कार्यशाळा संपन्न

स्थानिक स्व.राजकमलजी भारती कला वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय,येथे फुलांपासून रांगोळी बनविणे ही कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.ए.पिस्तूलकर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.पांडे उपस्थित होते. कार्यक्रमांतर्गत मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय वक्तव्यामध्ये प्राचार्य डॉ.एन. ए.पिस्तुलकर यांनी स्वयम रोजगाराचे महत्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. सरकारी अथवा खाजगी नोकरी न करता अर्थार्जनासाठी स्वतः स्वयंरोजगार करावा असे विद्यार्थ्यांना सांगितले. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.पांडे यांनी स्वयम रोजगाराच्या प्रेरणेतून छोटा व्यवसाय सुरू करून जास्त उत्पन्न मिळविता येते व स्वयंरोजगारातून आपल्या कला,कौशल्य व गुणांना संधी मिळते असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तन्वी संतोष पिसे हिने केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी महादेव क्षीरसागर हिने केले. कार्यक्रमाला एकूण 40 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.स्व.राजकमलजी भारती कला वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय आर्णी येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Copyright ©