यवतमाळ सामाजिक

स्व.पी.एल.शिरसाट ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रफुल व्यवहारे तर उपाध्यक्षपदी साजिद पतलेवाले यांची निवड

स्व.पी.एल.शिरसाट ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रफुल व्यवहारे तर उपाध्यक्षपदी साजिद पतलेवाले यांची निवड

स्व. पी. एल. शिरसाठ प्रणित ग्रामीण पत्रकार संघ शाखा दिग्रसच्या सदस्यांची बैठक गुरुवारी सायंकाळी ७ वाजता येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीत अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी लढा देणे, लेखणीच्या माध्यमातून समाजकार्य करणे, पत्रकारांच्या समस्या सोडविणे तसेच इतर विषयावर चर्चा करण्यात आली. त्यासह या बैठकीत संघाची दिग्रस कार्यकारणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी सर्वानुमते प्रफुल्ल व्यवहारे, उपाध्यक्षपदी साजिद पतलेवाले, सचिव पदी सुनील साबळे, कोषाध्यक्ष पदी राजपाल बन्सोड तर सल्लागारपदी सय्यद मोहसीन यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी विलास निकम, सदानंद जाधव, अजित महिंद्रे, पृथ्वीराज चव्हाण, रामदास मागूळकर उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©