महाराष्ट्र यवतमाळ

“विश्वातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा व हिंदुस्तान हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व प्रगत देशांच्याही पुढे जावे” -सद्गुरू श्री वामनराव पै

“विश्वातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा व हिंदुस्तान हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व प्रगत देशांच्याही पुढे जावे” -सद्गुरू श्री वामनराव पै

“विश्वातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा व हिंदुस्तान हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व प्रगत देशांच्याही पुढे जावे”

हा संकल्प असणारे सद्गुरू श्री वामनराव पै ह्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. सद्गुरुनी सन १९५२ पासून सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख,शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, व्याख्याने इत्यादी माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले.

त्यांचाच संकल्प सिद्धीस नेण्यासाठी जीवनविद्या मिशन शाखा नेरूळ,नविमुंबई व यवतमाळ केंद्राद्वारे डॉ. नंदुरकर विद्यालय, श्री सत्यसाई इंग्लिश मिडीयम स्कुल, जायंट्स इंग्लिश मिडीयम स्कुल व सुसंस्कार विद्यालय ईत्यादी शाळांमधून संस्कारशिक्षण अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘उत्कर्ष विद्यार्थ्यांचा, संकल्प जीवनविद्येचा’ हा विद्यार्थी कोर्स दि.७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित केला आहे.

तसेच दि.७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ६ ते ७:३० वाजता हनुमान मंदिर पुष्पकुंज सोसायटी-सत्यनारायण ले-आउट वडगाव रोड यवतमाळ येथे सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या सद्शिष्या कांचनताई पालव, मुंबई ह्यांचे सुश्राव्य प्रबोधनाचे आयोजन केले आहे. प्रबोधनाचा विषय आहे ‘मंगल मन हे प्रभूचे मंदिर’

जीवनविद्या मिशन यवतमाळ केंद्राद्वारे समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर विनामूल्य प्रबोधनाचा लाभ घ्यावा. संपर्क धनंजय सिरसाठ ९८९२४९३१६५, अविनाश जीद्देवार ७०८३८७८९०९. यांनी आवाहन केले.

Copyright ©