यवतमाळ शैक्षणिक

मनपुर जिल्हा परिषद शाळेत वन्यजीव सप्ताह साजरा

मनपुर जिल्हा परिषद शाळेत वन्यजीव सप्ताह साजरा

03 ऑक्टोंबर 23 रोजी हिवरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मनपुर जिल्हापरिषद शाळेत वनविभाग व संयुक्त वन्यवस्थापन समिती मनपुर आणि MH29 हेल्पिंग हॅण्ड च्या संयुक्त विद्यमाने आयोजित वन्यजीव सप्ताह मनपुर बिटचे राऊंड ऑफिसर सुनील लोहकरे यांच्या मार्गर्शनाखाली साजरा करण्यात आला.

त्यावेळी वनविभागाच्या मनपुर वनवर्तुळतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. आणि विद्यार्थांना पर्यावरण रक्षणाचे महत्व समजावून सांगितले.

यावेळी अर्जुना बीट वनरक्षक यांनी मनोगतात  सांगितले की, वन्यजीव सप्ताह कार्यक्रम राबवून विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ, शेतकरी यांच्यामध्ये जनजागृती करणे, ही काळाची गरज आहे. वनांचे संरक्षण करणे, वन्यप्राण्यांना आधार देणे, आवश्यक आहे. आजच्या काळात जंगलातील पशूपक्षी नामशेष होत चालले आहेत. हे कुठेतरी थांबवायचे असेल तर वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करुन ते लोकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज बनली आहे, अशाप्रकारचे मार्गदर्शन वनरक्षक सावरकर यांनी केले.

यावेळी गावातील नागरिक,सरपंच, वनरक्षक विवेक पांडे, संयुक्त वन्यवस्थापन समिती, MH29 हेल्पिंग हॅण्ड टीम ,आणि शाळेतील शिक्षक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©