यवतमाळ सामाजिक

तळणी येथील आदर्श घोटाळा संस्थाध्यक्ष सह कृषी प्रवेक्षकावर कारवाई करावी. सुनील पोतघंटवार

तळणी येथील आदर्श घोटाळा संस्थाध्यक्ष सह कृषी प्रवेक्षकावर कारवाई करावी. सुनील पोतघंटवार

आर्णी तालुक्यातील तळणी हे गाव आदर्श ग्राम म्हणून निवड करण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र आदर्श ग्राम समितीचे अध्यक्ष पोपटरावजी पवार जिल्हा कृषी अधीक्षक सह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळणी येथे सभा घेण्यात आली होती त्यात गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व आदर्श ग्राम च्या सर्व प्रक्रियेत मोठा सहभाग घेतला परंतु नंतर विकास संस्थेच्या माध्यमातून विकास काम करण्याचे ठरले व शासनातर्फे आदर्श ग्रामच निधी प्राप्त होणे चालू झाले त्याच काळात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच अस्वस्थ चालक त्यात समन्वय न झाल्यामुळे संस्था बदलून दुसऱ्या संस्थेला काम देण्यात आले ज्या संस्थेचे नाव जगदंब बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा सेवाभावी महिला संस्था धानोरा तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ असे असून शासनातर्फे आलेल्या निधीचा व्यवहार हा संस्थेचे अध्यक्ष कृषी प्रवेक्षक ग्राम आदर्श सेवक हे करू लागले परंतु आजपर्यंत झालेल्या कामाचा प्रथमदर्शनी फलक लावणे हे अनिवार्य असते परंतु कुठे यांनी तसा फलक लावलेला नाही सोबतच सूक्ष्म व्यवसायिकांना यांचा व्यवसाय वाढावा या उद्देशाने आदर्श ग्राम अंतर्गत निधी प्राप्त झाला होता मात्र तो निधी कुणाला दिला त्याचीही गावकऱ्यांना माहिती नाही सोबतच शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी मदत म्हणून स्पिंकलर पाईप सड देणे सात लाख तीस हजाराचा निधी प्राप्त झालेला होता मात्र मागे पाईपाचे वाटप झाले परंतु त्यात शेतकरी लाभार्थी नसल्याचे लक्षात येते आज पर्यंत झालेला जेवढा निधी प्राप्त असेल त्यात झालेले काम हे अनियमित प्रमाणे दिसून येत असल्यामुळे दिनांक चार-दहाला 2023 रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुनील पोतगंटवार यांनी चौकशी करावे असेच निवेदन देण्यात आले माझ्या व गावकऱ्यांच्या समाधानकारक चौकशी न झाल्यास पुढील पाऊल उचलू असे पत्रकारांशी बोलताना सांगितले

Copyright ©