यवतमाळ सामाजिक

शोतोकान कराटे डो असोसिएशन,यवतमाळच्या खेळाडूंचे विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड


शोतोकान कराटे डो असोसिएशन,यवतमाळच्या खेळाडूंचे विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड

क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धा दिनांक 03 ते 04 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळचे विद्यार्थी 17 वर्षे वयोगटात श्रवण निकेश कडूकार, पियुष राठोड व 19 वर्ष वयोगटात सोहम जयस्वाल या खेळाडूंनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवुन प्रथम क्रमांक प्राप्त केला. व होणाऱ्या विभागीय वुशू क्रीड़ा स्पर्धेत आपले नाव नोंदवले आहे. तसेच वेदांत गौरकार, ओम राहुल कडूकार, कौशल नंदकिशोर येन्नरवार, कु. गौरी खोडकुंबे या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेतील असुन हे विद्यार्थी प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ येथे प्रशिक्षण घेतात. या खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक श्री. रोहित केवारकर, श्री.विनोद खोडकुंबे श्री. अजित मिश्रा,श्री. हेमंत उईके व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), प्रवीण दिघाड़े, हितेश महानुर, व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©