यवतमाळ सामाजिक

सायास फाउंडेशन द्वारा फॅन्सी फ्रॉक स्टीचिग स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी 

सायास फाउंडेशन द्वारा फॅन्सी फ्रॉक स्टीचिग स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

01 आॅक्टोंबर 2023 रोजी सायास फाऊण्डेषन व्दारा आयोजीत ‘फॅन्सी फ्राॅक स्टिचिंग स्पर्धा-2023 पारितोशिक वितरण कार्यक्रम’ मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ. अर्पिता देषमुख मॅडम, टीम लिडर सायास फाऊण्डेषन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. दिलीप खुपसे, प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब हे उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्षपर भाशणामध्ये सौ. अर्पिता देषमुख मॅडम यांनी टेलरिंगचे कौषल्य हे स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करते, त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडू देत नाही. किंबहुना स्पर्धकांनी कोर्स करून इथेच न थांबता स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे असे आवाहन केले. प्राचार्य डाॅ. खुपसे सर यांनी स्पर्धकांनी छान असे प्रोडक्ट तयार केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. स्त्रियांनीसुद्धा व्यावसायाभिमुख षिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे अषाप्रकारचे आवाहन केले.

दिनांक 01 ते 06 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये मोफत स्वरूपात घेतलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण 15 ते 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांनी आपल्या स्वतःच्या कल्पनेतून उत्तम दर्जाचे फॅन्सी फ्राॅक दिलेल्या कालावधीमध्ये तयार केले. या स्पर्धेमध्ये सौ. वर्शाताई योगेष्वराव वाघ यांनी प्रथम, सौ. अनिता गोपाल दुधे यांनी व्दितीय तर सौ. मृणाली हरीष पिल्लारे यांनी तृतीय पारितोशिक मिळविले. सायास फाऊण्डेषनच्या वतीने मान्यवरांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सर्व स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. स्पर्धकांनी तयार केलेल्या संुदर फॅन्सी फ्राॅकचे लहानमुलीच्याव्दारे संगीतमय वातावरणात सादरीकरण करण्यात आले. या फॅषन षो मुळे तर कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वर्शा खानझोडे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन कु. देवयानी कोरडे यांनी तर आभार कु. पिल्लारे या मुलीने केले. कार्यक्रमाचे यषस्वी आयोजन सायास फाऊण्डेषनच्या प्रषिक्षक सौ. वर्शा खानझोडे मॅडम, सौ. प्रतिक्षा भाकरे, व समस्त सायासची टीम यांनी केले. सदर कार्यक्रमाला काॅलनीमधील बहुसंख्य स्त्रियांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Copyright ©