यवतमाळ सामाजिक

अनियमित विद्युत पुरवठा,सर्व सामान्यांना कमालीचा त्रास

अनियमित विद्युत पुरवठा,सर्व सामान्यांना कमालीचा त्रास

ऐन धार्मिक कार्यक्रमाचे वेळी विद्युत पुरवठा ठेवण्यात येतो बंद

अनियमित विद्युत पुरवठा,सर्व सामान्यांना कमालीचा त्रास होत असल्याने सतत होत असलेली मनमानी कधी थांबेल?

ऐन धार्मिक कार्यक्रमाचे वेळी विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने ग्रामस्थांन संतापाची लाट उसळली आहे सर्वत्र गौरी पूजन सोहळा सुरू असताना विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला लाईन मन यांना विचारणा केली असता 33 केव्ही येथूनच बंद असल्याने पुरवठा होऊ शकत नाही तर या बाबत शाखा अभियंता वानखेडे नॉट रीचेबल ये. ई ही कव्हरेज क्षेत्रा बाहेर असल्याने अनेकान मध्ये तीव्र संताप वेक्त करण्यात येत आहे इतर वेळी तर  बारा तासात सहा ते सात वेळा  लाईन ये जा करते या विद्युत कंपंनी च्या मनमानी कारभारानी ग्राहक त्रस्त झाले आहे सिंगल फेज लाईन झाली की लोडशेडींग  पासून मुक्ती मिळणार मात्र मुक्ती तर मिळालीच नाही उलट शक्ती सुरू झाली आहे मनात येईल तितके देयक दिल्या जाते आणि सक्तीने वसुली केल्या जात असल्याने सद्या हुकूम शाही सुरू आहे मागील अनेक वर्षांपासून विद्युत कम्पंनी कडून ग्राहकांची फसवणूक करून लूट करत आहे यातच तासनतास विद्युत पुरवठा बंद राहतो अनेक वेळा सांगितल्या जाते की ब्रेक डाऊन आहे कुठे झाड पडले तर कुठे झाडाच्या फांद्या लागत असल्याने ब्रेक डाऊन झाल्याचे कारण समोर केल्या जाते उन्हाळ्यात मेंटन्स करिता लाखो रुपये खर्च दाखविल्या जाते मात्र कोणत्याही प्रकारची साफ सफाई न करता येणारा निधी सरळ यांच्या घशात जात आहे आणि सर्व सामान्यांना जो त्रास दिल्या जात आहे आणि लोक प्रतिनिधी हे  केवळ बघ्याची भूमिका घेऊन आपले स्वार्थ साधण्यासाठी धडपडत असतात मात्र जनतेच काहीही सोर सुतक नाही हि फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

Copyright ©