Breaking News यवतमाळ

जिरामीरा येथील शिक्षकाच्या गाडीचा अपघात.चारजण गंभीर जख्मी.

जिरामीरा येथील शिक्षकाच्या गाडीचा अपघात.चारजण गंभीर जख्मी.

एअर बॅग निघाल्याने वाचला जीव.

यवतमाळ ते पांढरकवडा महामार्गावर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याचे प्रयत्नात जबर अपघात झाल्याची घटना दिनांक ३०सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजताचे दरम्यान घडली.

घटनेतील सविस्तर वृत्त असे की यवतमाळ येथील वास्तव्यास असणारे व जिरामिरा येथील हायस्कूलमध्ये शिक्षकपदावर कार्यरत असलेले विजय बारी व त्यांचे चार सहकारी शिक्षक बांधव नेहमी प्रमाणे शनीवारी सकाळची शाळा आटोपुन आपल्या एम.एच.२९ बी.सी.७७४५ क्रमांकाच्या स्विफ्ट वाहनाने परत यवतमाळ जात असताना अचानक यवतमाळ ते पांढरकवडा महामार्गावर असलेल्या तळेगाव ते खांनगाव रस्ताअंतराचे मध्य रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याचे प्रयत्नात वाहन चालक विजय बारी यांचे वाहनावरील संतुलन सुटले व वाहन रस्त्यावरील झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात वाहनातील चारजण गंभीर जख्मी झाले आहे.

घटनेची माहिती होताच त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून
झालेल्या अपघातात गाडीच्या इयरबॅग खुलल्या ने जीवहानी टळली तर गाडीत प्रवास करीत असलेल्या पाचजणापैकी चार रुग्णांना हात व पायाला जबर मार असुन एकास डोके,पाठ व कंबरेला जबर दुखापत झाली आहे .

Copyright ©