महाराष्ट्र सामाजिक

संघमित्रा विकास मंडळ यांच्या वतीने बोरी अडगाव येथे बुद्ध मूर्तीस्थापना भन्ते विनयपाल महाथेरो यांच्या हस्ते संपन्न.

संघमित्रा विकास मंडळ यांच्या वतीने बोरी अडगाव येथे बुद्ध मूर्तीस्थापना भन्ते विनयपाल महाथेरो यांच्या हस्ते संपन्न.

यावेळी भन्ते विनयपाल महाथेरो म्हणाले, बुद्ध ही व्यक्ती नसून ते ज्ञानाचं सर्वोच्चपद आहे.

मनाच्या स्थितीचे किंवा अवस्थेचे नाव आहे. मनाची अशी अवस्था की, जी मानसिक विकासाच्या अत्युच्च शिखरावर पोहचली आहे.

निब्बान बुद्ध म्हणजे असा व्यक्ती ज्याने आत्मज्ञान आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे आणि ज्याला चार आर्यसत्यांची पूर्ण जाणीव आहे.

बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे असा सम्यक सम्बुद्ध किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष खामगाव विनेश इंगळे, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखा ताई सावंग, पद्माताई तायडे डिव्हिजन ऑफिसर बुलढाणा, सिताराम तिडके तालुका सरचिटणीस, राहुल सुरवाडे सामाजिक कार्यकर्ते, दादाराव मोरे तालुका उपाध्यक्ष भा.बौ.महा, अशोक इंगळे तालुका संघटक. सावंग साहेब, वानखडे साहेब, शेषराव तायडे, तसेंच महाप्रजापती महिला मंडळ,जयराम गड, माहामाया महिला मंडळ शिला नेमाने, मायावती महिला संघ, रमाई महिला संघ, सुजाता महिला संघ पंचशील महिला संघ, संगमित्रा महिला संघ, प्रेरणा महिला संघ तसेच गजानन वानखडे कपिल भाऊ विजय इंगळे दिलीप सुरवाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्माजी सुरवाडे विनोद सुरवाडे, राहुल सुरवाडे, निलेश सुरवाडे संघपाल सुरवाडे,स्वाती सुरवाडे, विकी सुरवाडे, अरविंद सुरवाडे, सत्यपाल सुरवाडे, प्रतिभा सुरवाडे, नंदाबाई सुरवाडे, मालाबाई सुरवाडे, आकाश खरात यांनी यशस्वी प्रयत्न केले.

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सुरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद सुरवाडे यांनी केले. कार्यक्रम साठी पंचक्रोशीतील शेकडो उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते!

Copyright ©