यवतमाळ सामाजिक

आमरण उपोषणाच्या दणक्याने प्रशासन निद्रावस्थेतून जागे होऊन अवघ्या दोन तासात उपोषणाची सांगता. 

आमरण उपोषणाच्या दणक्याने प्रशासन निद्रावस्थेतून जागे होऊन अवघ्या दोन तासात उपोषणाची सांगता.

तालुक्यातील आष्टोणा येथील निलेश शंकर भोयर नामक व्यक्ती हा गेल्या दोन वर्षापासून स्वतःच्या स्वखर्चाने वडकी येथे प्लॉट घेतला परंतु हा व्यक्ती गेल्या दोन वर्षापासून आपल्या घेतलेल्या प्लॉटची मोजणी शीट उपलब्ध व्हावी याकरिता राळेगाव येथील भूमी अभिलेख कार्यालय येथे नेहमी ये जा करीत होता परंतु त्यांच्या या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने दुर्लक्ष केल्याचे असल्याने व प्रशासन हे निद्रावस्थेत असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी शेवटी कोणताही पर्याय नसल्याने आज २६ जून रोजी तहसील कार्यालय राळेगाव येथील दरवाजाच्या समोर आमरण उपोषणास बसण्याची वेळ आली l ही बाब तालुका पत्रकार संघटना सदस्य शंकर वरघट यांनी राळेगाव तालुका पत्रकार संघटना यांच्या निदर्शनात आणून दिल्यामुळे राळेगाव तालुका पत्रकार संघटना अध्यक्ष महेश दादा शेंडे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तहसील कार्यालय गाठले व तिथे जाऊन पूर्ण प्रकरणाची शहानिशा केली भूमी अभिलेख कार्यालय राळेगाव येथील अधिकारी यांच्याशी बोलून विचारणा केली असल्यास पूर्वी असलेले नागोसे अधिकारी यांच्या दिरंगाईने मोजणी शीट बनविले नाही ती अवघ्या काही वेळात त्यांना देण्यात येईल असे सांगितल्याप्रमाणे दोन तासात मोजणी शीट ही उपोषणकर्त्याच्या हातात देऊन उपोषण सोडण्यात आले त्यावेळी भारतीय जनता पार्टी राळेगांव तालुका शहर प्रमुख डॉक्टर कुणाल भोयर, परिक्षाविधीन तहसीलदार, भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी गवळी यांच्या मदतीने अवघ्या दोन तासात उपोषणाची सांगता करण्यात आली

Copyright ©