यवतमाळ सामाजिक

निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधात 2 ऑक्टोबर ला एकदिवसीय धरणे आंदोलन

सावळी सदोबा आशिफ खान 

निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधात 2 ऑक्टोबर ला एकदिवसीय धरणे आंदोलन

विदर्भ मराठवाड्यातील 95 गावावर नांगर फिरवू पाहणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला गेल्या पंचवीस वर्षापासून धरण विरोधी संघर्ष समितीने कडाडून विरोध केलेला आहे,

आता शासनाने धरणाच्या भिंतीचे टेंडर काढले असून विस्थापीत होणाऱ्या 95 गावापैकी पहिल्या टप्प्यातील 18 गावांना पुनर्वसनाच्या नोटीस बजावलेल्या असून धरणाच्या कामाला गती दिल्यामुळे बुडीत क्षेत्रात शासना विरोधात प्रचंड रोष खदखदत आहे.

2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसेच्या मार्गाने एक दिवसीय धरणे आंदोलन करून या प्रकल्पाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी धरणविरोधी संघर्ष समितीने केली आहे.

2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर व माहूर तालुक्यातील माहूर तहसील कार्यालयासमोर धरणविरोधी संघर्ष समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले असून या आंदोलनात बुडीत क्षेत्रातील जनतेने सहभागी होण्याचे आव्हान धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, मुबारक तंवर , प्रल्हादराव गावंडे सर , बंडू नाईक , डॉ.बाबा डाखोरे , डॉ.सुप्रिया गावंडे ,गुलाब मेश्राम, नामदेव कातले , विजय पाटील राऊत, शेषराव मुनेश्वर , निलेश कुमरे, गजानन डाखोरे, बाबुभाई फारुकी, काॅ.शंकर सिडाम,विजय पाझारे, ,बंटी पाटील जोमादे , सचिन टनमने , किशोर हुडेकर, काॅ.किशोर पवार , अमित ठाकरे, भगवतीप्रसाद नाईक तितरे‌ , राम इंगोले, जयराम मिश्रा , विठ्ठल गावंडे , कैलास उकले इत्यादींनी केले आहे.

Copyright ©