यवतमाळ सामाजिक

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा !

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा !

यवतमाळ येथील हिंदुत्ववादी संघटनांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सादर !

यवतमाळ – सनातन धर्माविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणारे तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन 27 सप्टेंबर ला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे की,

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र तथा तामिळनाडू राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी चेन्नई येथील ‘सनातन उन्मूलन’ या जाहीर कार्यक्रमात बोलतांना म्हटले होते, “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचे उच्चाटन केलं जायला हवं, डास, डेंगू, मलेरिया आणि कोरोना सारख्या आजारांना विरोध केला जाऊ शकत नाही, त्याच उच्चाटनच् केलं जायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचहि व्हायला हवं.” असे अत्यंत आक्षेपार्ह आणि कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. कर्नाटक राज्याचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे यांनी या वक्तव्याचे समर्थन करतांना म्हटले, “उदयनिधी स्टॅलिन हे काहीही चुकीचे बोलले नाहीत, जो धर्म समानता देत नाही, तो धर्म सामाजिक रोगासमानच आहे. सनातन धर्माच्या विरोधातील या वक्तव्यांची मालिका थांबलेली नसून आता द्रमुक पक्षाचे तामिळनाडू येथील खासदार ए. राजा यांनीही या वादात आग भडकवतांना म्हटले, “सनातनबाबत उदयनिधी यांची भूमिका मवाळ होती. सनातन धर्माची तुलना सामाजिक कलंक असलेल्या रोगांशी केली पाहिजे, तर उदयनिधी यांनी सनातनची तुलना केवळ मलेरियाशी केली आहे. सनातनची तुलना एच. आय. व्ही. (एड्स) आणि कुष्ठरोग यांसारख्या सामाजिक कलंक असलेल्या रोगांशी केली पाहिजे.

आपला देश हा ‘धर्मनिरपेक्ष’ आहे. अनेक हिंदुविरोधी लोक या धर्मनिरपेक्षतेच्या आडून धर्मावर आसूड ओडण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. गेल्या काही दिवसांमध्ये याचे प्रमाण लक्षणीयरित्या (कि षड्यंत्रपूर्वक) वाढले असून याद्वारे देशातील बहुसंख्य हिंदु समाजाला चिथवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जगातील भारत हा एकमेव देश आहे, ज्या देशातील बहुसंख्य समाजाच्या धर्मावर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केली जात आहे आणि त्याकडे ‘ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे पाहिले जात आहे, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे असे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

या निवेदनासोबत देशाला घातक असलेल्या हलाल संकल्पना अंतर्गत हलाल प्रमाणपत्र देण्याचा अधिकार खासगी संस्थांना देऊ नये, या मागणीचेही निवेदन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांना पाठवण्यात आले.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज औदार्य, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे विनोद अरेवार, सनातन संस्थेचे पांडुरंग पिल्लेवार, हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय फोकमारे, राम धारणे उपस्थित होते.

Copyright ©