Breaking News यवतमाळ

देवणाळा येथे विद्युत स्पर्शाने बैलाचा मृत्यु.

देवणाळा येथे विद्युत स्पर्शाने बैलाचा मृत्यु.

नुकसान भरपाईची मागणी.

येथुन जवळच असलेल्या देवणाळा येथे शेतात तुटलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बैलाचा मृत्यु झाल्याची घटना दिनांक २९सप्टेंबर रोजी घडली.

देवणाळा शेतकरी सुदाम राठोड हे सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात बैल चारण्यासाठी गेले असता चरत असताना तुटलेल्या जिवंत विद्युत तारेचा बैलाला स्पर्श होताच तो जागीच ठार झाला तर दुसऱ्या बैलाला किरकोळ इजा झाली असुन अंदाजे सत्तर हजार रुपये किमतीचा बैल दगवला असल्याची माहिती शेतकरी सुदाम राठोड यांनी दिली.

ऐन शेतीच्या महत्त्वाच्या वेळी बैल मरण पावल्याने पुढील शेतीकाम कसे करावे? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला असल्याने

सबंधित विभागाने सदर घटनेची दखल घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरीत मदत देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

Copyright ©