Breaking News यवतमाळ

ठाणेदाराचा रायटर करतो वसुलीचे काम म्हणून अवैद्य व्यावसाय चालतो खुले आम

ठाणेदाराचा रायटर करतो वसुलीचे काम म्हणून अवैद्य व्यावसाय चालतो खुले आम

वर्षभर सिव्हिल ड्रेसवर राहणाऱ्या रायटरची तातडीने उचल बांगडी होणार का?

काही वर्षाआधी कळंब शहर धार्मिक व अष्टविनायक व अतिशय शांत शहर म्हणून ख्याती होती . दोन नंबर व्यवसाय मुक्त म्हणून जिल्ह्यात पोलीस दप्तरी नोंद असून केवळ आर्थिक स्वार्थापायी शहरात शिस्तप्रिय पोलीस विभागाच्या वतीने अवैध व्यवसाय करण्यासाठी देण्यात येत असलेल्या मुख संमतीमुळे मुळे शहरात रोज कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्याऱ्या घटना घडत आहे.

येथील अवैध धंद्यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. छोट्या छोट्या कारणावरून शहरात रोज वाद निर्माण होत असुन गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कळंब पोलीसांचे यावर कुठेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे नव्याने रुजू झालेले ठाणेदार दिपमाला भेडें रुजू झाल्यापासून शहरातील कायदा व सुव्यवस्थे बाबत कुठलीही पावले उचललेली नाहीत परंतु रायटरनेच पावले उचललेली असून अवैध धंदे वाल्यांना भेटून मी आहे ना! पाहून टाकू ठाणेदाराला मी सांभाळतो असे अभय देऊन मोठमोठ्या रक्कमा वसूली केल्या आहेत. परंतु ठाणेदाराला कुठलीच माहिती नाही तर नुकताच मागील आठवड्यात रायटरने एक शिपाई सोबत घेऊन शेतात ५२ पत्ते जूगार पकडून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वसूली केली व ठाणेदारा समोर हजर करुन पाच जणांवर गुन्हा दाखल केला तर बाकीच्यांना आर्थिक मायेपोटी सोडून दिल्याची शहरात जुगार खेळणाऱ्यां कडूनच चर्चा झाली आहे.तर यांच्या कारनाम्यांना कळंब पोलीस स्टेशन मधिल कर्मचारी सुध्दा वैतागले असल्याची चर्चा सुरु आहे. वर्षभर सिव्हिल ड्रेस वर राहून अवैध वसूली करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तातडीने उचल बांगडी करावी नव्यानेच

शहरातील आठवडी बाजार परीसरात,बसस्थानक परिसरात ,मच्छी मार्केट ,इंदिरा चौका मध्ये खुले आम मटका,दारू, जुगार, अवैध वाहतूक , अवैध रेती तस्करी इत्यादी अवैध व्यवसाय शहरात खुलेआम सुरू असताना पोलीस विभागाला आर्थिक मलींदा मोठ्या प्रमाणात मिळत असून ठाणेदाराचे रायटर वर्नषभरही सीव्हील ड्रेस फिरुन मोठ्या प्रमाणात वसुली एजंट बनले आहे. ठाणेदार यांना अंधारात ठेवून मोठ्या प्रमाणात म्हणजे पाच आकड्यातच वसूली सुरु केली आहे.यांच्यामुळे पोलीस खाते बदनाम होत चालले असून कळंब शहरासह तालुक्यात ठाणेदाराच्या रायटरचीच वसुली साठी चर्चा ऐकायला येत आहे. तेंव्हा ठाणेदारांनी रायटरला आवर घालून एकदा याचा “ओम नमो शिवाय ” केला तरच पोलीस स्टेशनची घडी सुधारेल अशी शहरवासीयांमध्ये खमंग चर्चा सुरु झाली आहे. हे विशेष कळंब पोलीसाने वरकमाईचे साधन म्हणून शहरात सुरु केलेले अवैध व्यवसाय जुगा‌र,मटका, अवैध दारु ईत्यादी बाबींवर कळंब पोलीसांनी आवर घालून शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पायबंद घालावा अशी शहरवासीयांची मागणी आहे.पोलीस अधिक्षक, अवैध धंदे हद्दपार कुरण्याचे प्रयत्न करत असुन, कळंब शहरात अवैध धंद्याला श्रेय कोणाचे?

Copyright ©