यवतमाळ सामाजिक

दिग्रस च्या श्री बालाजी संस्थांच्या वतीने श्री चा झुला उत्सव साजरा

दिग्रस च्या श्री बालाजी संस्थांच्या वतीने श्री चा झुला उत्सव साजरा

मागील पन्नास वर्षापासूनची परंपरा कायम

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मागील पन्नास वर्षाची परंपरा कायम राखत दिग्रस च्या श्री बालाजी संस्थांच्या वतीने 27 ऑगस्ट 2023 ते 26 सप्टेंबर 2023 पर्यंत श्रींचा झुला उत्सव साजरा करण्यात येतो या उत्सवामध्ये श्री ची मूर्ती झुल्यामध्ये विराजमान करून दररोज रात्री साडेसात वाजता भजन व आरती करण्यात येते, दानशूर दात्याकडून आरतीचे व रोषणाईचे आयोजन करण्यात येते तर 26 सप्टेंबर रोजी श्रींची झुल्यामध्ये विराजमान करून मिरवणूक काढण्यात येते यावेळी झुल्यामध्ये श्रींची मूर्ती ठेवून शहराच्या मुख्य रस्त्याने मिरवणूक काढून झुला उत्सव साजरा केला श्री बालाजी संस्थांच्या विश्वस्त मंडळातर्फे आयोजन केले जाते तसेच संचालक मंडळ कार्यकर्ते महिला आवर्जून उपस्थित राहत असतात यामध्ये विजयकुमार बंग, विनोद राठी, गोपाल शहा, डॉ मनीष अटल, डॉ बजाज, डॉ मुरलीधर राठी, डॉ सचिन अग्रवाल, डॉ वंदना अटल, डॉ रश्मी बंग, डॉ निधी शेजपाल, जय शर्मा, किशोर साबु, अजय मोदाणी,दिनेश लड्डा,संदीप काकाजी, जाजू साहेब, श्रीकिशन जाजडा, अशोक अटल, अशोक मालपाणी ,अशोक राठी सह महिला मंडळींनी परिश्रम घेत श्री चा झुला उत्सव अगदी उत्साहात पार पाडला

Copyright ©