Breaking News यवतमाळ

मातीमंद मुलगी झाली नराधमाच्या अत्याचाराने गरोदर

मातीमंद मुलगी झाली नराधमाच्या अत्याचाराने गरोदर

दिग्रस पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

तालुक्यातील आरंभी येथे डोळ्याने अपंग त्यात मतीमंद असलेल्या युवती सोबत गावातीलच एका नराधमाने वारंवार अत्याचार केल्यामुळे मतिमंद कुमारी युवतीला गर्भधारणा झाल्याची गंभीर बाब पीडित युवतीचे भावासह नातेवाईक दिग्रस पोलिसात तक्रार देण्याकरिता आल्यामुळे उघडकीस झाली. त्यावरून दिग्रस चे ठाणेदार संजय सोळंके स्वतः ॲक्शन मोड मध्ये येऊन आरोपीला ताबडतोब आरंभी येथे जाऊन त्या नराधमाला ताब्यात घेतले.
त्या मतिमंद युवतीचे लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले युवती मतिमंद व दोन्ही डोळ्यांनी अपंग अशा अवस्थेत आपल्या आयुष्याचे एक एक दिवस पुढे नेत असताना गावातीलच लिंग पिसाटाने अशा युवतीवर अनेक वेळा कीळस्वानी कृत्य करून कुमारी युवतीला गर्भवती केल्यामुळे या दुर्दैवी घटनेची तक्रार देण्याकरिता पीडित युवतीच्या भावासह नातेवाईकांनी दिग्रस पोलीस स्टेशन गाठले. मात्र दुपारी बारा साडेबारा वाजता च्या दरम्यान पासून रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यासाठी दोन माझी पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने हालचाली मंदावल्याची कुन कून सूरू होती.पीडित युतीच्या कुटुंबाने धीर न सोडता युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरंभी येथील अमोल दामोधर चव्हाण याला अटक न केल्यास आम्ही पोलिस स्टेशन सोडूच नाही ही भुमिका घेतल्याने अखेर पोलिसांनी आरोपी अमोल दामोधर चव्हाण (वय २६ वर्ष) याच्यावर कलम ३७६, ३७६, २(एन), ३७६, २(आय), ५०६ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

 

Copyright ©