Breaking News यवतमाळ

छत्रपती संभाजी नगरमध्ये घरावर वीज पडून पॅरापिटचे नुकसान

छत्रपती संभाजी नगरमध्ये घरावर वीज पडून पॅरापिटचे नुकसान

सुदैवाने चार नागरिक बचावले

दिग्रस येथील छत्रपती संभाजीनगर मधील आसिफ पटेल यांच्या घरावर ओलसर बास्यावर (वेळू) ध्वज लावण्यात आला होता. बासा ओलसर असल्याने विज आकर्षित झाल्याचे बोलल्या जात आहे. आज सकाळी अंदाजे ७ वाजताच्या दरम्यान खूप मोठा आवाज होऊन लख्ख प्रकाश पडून आसपास वीज पडल्याचे भासत असल्याने लोक घराबाहेर पडून कूठे वीज पडल्याचे शोध घेत होते. ज्या घरावर वीज पडली त्या परिसरात काही महिला नळावरून पाणी भरत होत्या, त्या मात्र सुखरुप बचावल्या. वीज पडण्याचे दृश्य पाहून सदर महिलांनी देवाच्या कृपेने बचावल्याचे सांगितले. वीज पडलेल्या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी दिसून आली. वीज पडल्याने वलसर बासा उभा चिरून बाश्याचे अनेत तुकडे झाले असुन विद्युत उपकरनाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही.

Copyright ©