यवतमाळ सामाजिक

सुर्यकोटी गणेश मंडळाकडून भव्य डोळे तपासणी शिबिर

सुर्यकोटी गणेश मंडळाकडून भव्य डोळे तपासणी शिबिर

२०० च्या वर भाविकांनी घेतला शिबिराचा लाभ

सुर्यकोटी गणेश मंडळ दिग्रस व नवजीवन सामाजिक विकास केंद्र, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार (ता.२४ सप्टेंबर) कॉम्प्युटरद्वारे भव्य डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याच शिबिरात अल्पशः दरात चष्मे वाटप देखील करण्यात आले आहे. २०० वर भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

दिग्रस मधील मोठ्या मारोती मंदिरा मागे असलेले सुर्यकोटी गणेश मंडळ यंदाचे १४ वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाज उपयोगी व सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यासह दिग्रस शहरात डोळ्यांची साथ पसरली होती. याच पार्श्वभूमीवर भक्तांकरिता मंडळाने यंदा भव्य अशा डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी ९ वाजता गणरायाच्या पुजनाने शिबिराला सुरूवात झाली तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिर सुरू होते. शिबिरामध्ये अमरावती येथील तज्ञ डॉ.जयंत वानखडे यांनी कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी केली. यावेळी १०० वर नागरिकांकरिता चष्मा देखील उपलब्ध करून देण्यात आला. तर २०० च्या वर भाविकांनी डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष जिगर जेठवा, उपाध्यक्ष शुभम दुधे, सचिव ऋषिकेश हिरास, कुणाल बदुकले, निखिल बदुकले, महेश दुधे, आदर्श बोरकर, यश तुपोने, ऋग्वेद सारफळे, अभिजित दुधे, प्रज्वल हंबीरे, हिमांशू तायडे, सौरभ दुधे, धनंजय तळेगावकर, सोहम जाधव, सार्थक कोषटवार, पियुष बेदरकर, तन्मय तळेगावकर, प्रथम दुधे, वेदांत दुधे, कृष्णा सवणे, अनुज तळेगावकर, फरहान चव्हाण, आराध्य चीरडे, अंशुमन सवणे, राम कोषटवार,स्वयंम कोषटवार सह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©