यवतमाळ सामाजिक

यवतमाळ का राजा सेवा परिवार तर्फे गरजूंना तीन चाकी सायकल शिलाई मशीन व व्हील चेअर चे वितरण

यवतमाळ का राजा सेवा परिवार तर्फे गरजूंना तीन चाकी सायकल शिलाई मशीन व व्हील चेअर चे वितरण

मागील साठ वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील अग्रेसर नवयुवक गणेश मंडळ मारवाडी चौक यवतमाळ च्या वतीने यावर्षी गणेश उत्सवानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेत्या मध्ये आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मारवाडी चौक येथे नवयुवक गणेश उत्सव मंडळ च्या वतीने सात विकलांग बांधवांना तीन चाकी सायकलचे वितरण उमेद राठोड चिचघाट पंजाब कवडू गायकवाड किशोर म्हस्के अजय राठोड लोणीघटाणा गोपी राजेश नामुरते यांना . सात वृद्धांना व्हील चेअर त्यामध्ये हिराबाई घेरवाडा मीना यादव प्रवीण गायकवाड सुरेश पिपराणी यांना तसेच सात महिलांना शिलाई मशीनचे वितरण त्यामध्ये प्रणाली नेहारे सविता शिरभाते सारिका गाडेकर कमला टेंबरे आदींचा सहभाग असूनगरजूंना आत्मनिर्भर करण्यासाठी श्री महंत सावरिया बाबाजी तसेच पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक उद्योजक सुमित बाजोरिया श्रीमती कांचन शशिकांत जी शर्मा यांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात आले

याप्रसंगी श्री महंत सावरिया बाबाजी यांच्या शुभहस्ते आत्महत्याग्रस्त सात शेतकरी परिवाराला आत्मनिर्भर करण्यासाठी उद्योग व्यवसायाची सुरुवात करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी नवयुवक गणेश मंडळ मारवाडी चौक यवतमाळ यवतमाळ का राजा सेवा परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©