यवतमाळ सामाजिक

खाजगीकरण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी युवा एल्गार संघटनेचे आमरण उपोषण           

खाजगीकरण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी युवा एल्गार संघटनेचे आमरण उपोषण           

महाराष्ट्र शासनाने खाजगी कंपन्यांच्या मार्फत नऊ खाजगी कंपन्यांना शासकीय पद भरतीचे आदेश दिले आहे ते तात्काळ रद्द करावे त्याचबरोबर 62 हजार शाळा खाजगीकरण करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी शासकीय सेवेत असलेले सीएससी चे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करण्यात यावे त्याचबरोबर उमेद केदार अशा सेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी कर्मचारी ग्राम कर्मचारी रोजगार सेवक तथा ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी सर्व कर्मचारी यांना समान काम समान वेतन यांनी वेतन लागू करण्यात यावे या मागण्या पक्षासाठी 20 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू आहे  प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपिन भाऊ चौधरी यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे येत्या काळात जर उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य न केल्यास प्रहार पूर्ण जिल्हाभर आंदोलन करेल अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी डाटा एन्ट्री ऑपरेटर तसेच ग्राम रोजगार सेवक आणि उमेद अभियानातील कॅडर यांचा सुद्धा या आंदोलनाला पूर्ण पूर्ण पाठिंबा असून येत्या सोमवारपासून सर्व संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे उपोषण करते धनंजय वानखडे यांनी सांगितले आहे. युवा एल्गार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत मुनेश्वर नेर तालुकाप्रमुख विक्रम काळे जिल्हा परिषद सहकारी पतसंस्थेचे संचालक पप्पू पाटील भोयर कैलास राऊत आम आदमी पार्टीच्या वतीने सुद्धा या उपोषणाला पाठिंबा देण्यात आलेला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये दीपक कॉम्पलवार आमरण उपोषणाला बसत आहे

Copyright ©