यवतमाळ शैक्षणिक

पाथ्रड देवी येथे मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम 

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी

पाथ्रड देवी येथे मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम 

दारव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत गेले वर्षभर विविध कार्यक्रम सुरू आहेत. या अनुषंगाने देशात हामेरी मिट्टी मेरा देशह या उपक्रमांतर्गत मातीस नमन, वीरांस वंदन हे अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा, तालुका स्तरावर पंचप्राण प्रतिज्ञा, शिलाफलक व वीरांना वंदन असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक गावातील मूठभर माती सन्मानाने गोळा करून दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी पाठविण्यात येणार आहे. या अनुषंगाने केंद्राच्या कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची २२ जुलै रोजी दरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली.. त्यात हे कार्यक्रम राबविण्याचा आराखडा सादर करण्यात आला.त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा पाथ्रड देवी या संयुक्त विद्यमाने मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारला करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याकडुन गावामध्ये स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त्य संपूर्ण गावांत प्रभात फेरी काढून भव्य कलश यात्रा काढण्यात आली होती

 

यावेळी पाथ्रड देवी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नरेंद्र गायकवाड, विस्तार अधिकारी पंचायत दारव्हा श्री आग्रहरी साहेब व विस्तार अधिकारी श्री उपलेचवार साहेब ,सरपंच श्री जयसिंग राठोड, ग्रा.पं.कर्मचारी उल्हास जांभोरे, ग्रा.पं.सदस्य वामन राठोड, सुरेश गायकवाड, ग्रा.पं. उपसरपंच निर्मला दांडेकर, माझी ग्रा.पं.सदस्य लिंबसिंग पवार, लंकेश्वर जाधव, व जि.प.शाळेच्या शिक्षकवृंद मुख्याध्यापिका रोहनकर मॅडम, गुल्हाने मॅडम,संदीप खांदवे, घोडाम सर, पारवेकर सर, आरू सर, घोगले सर, चौकडे सर, वसंता राठोड, गजानन आडे, उत्तम चव्हाण, शेषराव जाधव, ओमशिव राठोड, अशोक आडे, चरण पवार, वसंता जाधव, अशोक जाधव,सुभाष जाधव, काही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जि.पं.शाळेच्या शिक्षक वृंदांनी व गावातील नागरिकांनी प्रयत्न केले असल्याची माहिती पाथ्रड देवी गावाचे लाडके सरपंच जयसिंग राठोड यांनी पत्रकार शक्ती तालुका प्रतिनिधी चेतन पवार यांना दिली दिनांक २१ सप्टेंबर, गुरुवार ला दिली.

Copyright ©