यवतमाळ सामाजिक

लाडखेड पोलीसांनी चोरटयास केले 12 तासात जेरबंद 

लाडखेड प्रतिनिधी – प्रदीप मेश्राम

लाडखेड पोलीसांनी चोरटयास केले 12 तासात जेरबंद 

लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या

वडगाव गाढवे येथील आरोपी नामे अरविंद नारायन जाधव वय 35 वर्ष वडगाव गाडवे यास लाडखेड पोलिसांनी बारा तासाच्या आत सखोल चौकशी करून जेरबंद केले यातील. आरोपी अरविंद याने फिर्यादी राजु पांडुरंग मनवर रा . वडगाव गाडवे हे अंतिम संस्कार करून तिसऱ्या दिवसाच्या कार्यकमा करिता साहित्य आनने साठी बाहेर गावी गेले असता पत्नी ही दाराची कडी लावून किराणा दुकाणात सामान आनने साठी गेली असता . कोणीतरी अज्ञात इसमाने दाराची कडी काढुन घरातील डब्या मध्ये ठेवूनअसलेले सोन्याचे पदक पाच नग .किंमत अंदाजे 14 हजार रुपये सोन्याचे मनी 24 नग दोन ग्रॅम किंमत अंदाजे दहा हजार रुपये चांदीच्या दोन पाटल्या वजन अंदाजे 15 तोळे किंमत अंदाजे दहा हजार सहाशे पन्नास रुपये असा एकूण 34000 750 रुपये चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने करून नेला आहे त्याबाबत राजू पांडुरंग मनोहर यांचे जवानी रिपोर्ट वरून लाडखेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला सदर गुन्ह्यातील आरोपी हा अज्ञात आरोपी असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर दारव्हा यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन लाडखेड ठाणेदार स्वप्निल निराळे यांनी अधिकारी व अमलदार यांची पथक तयार करून गुन्ह्याचा तपास करण्यात आले सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांना .मिळालेल्या गोपने माहितीवरून गुन्हा दाखल झाल्यापासून बारा तासाच्या आत यातील आरोपी नामे अरविंद नारायण जाधव यास ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हया मध्ये सोन्या चे पदक पाच नग सोन्याच मनी 24 नग चांदीच्या दोन पाटल्या असा एकूण मुद्देमाल 34000 750 रुपयाचा मुद्देमाल चोरी केल्याचे कबुली दिल्यानेवरील वस्तू जप्त करण्यात आल्या ही कारवाई लाडखेड ठाणेदार स्वप्निल निराळे . उपनिरीक्षक रितेश दीक्षित .प्रकाश रत्ने . विठ्ठल कोपनार जयंत शेंडे यांनी पार पाडली .

Copyright ©