यवतमाळ सामाजिक

निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष पेटणार

सावळी सदोबा आशिफ खान 

निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष पेटणार

गावाच्या परवानगी शिवाय कुन्या अधिकाऱ्याने गावात पायच ठेऊ नये

कवठा व चिमटा वासियांचा एकमुखी ठराव.

आर्णी तालुक्यातील कवठा ( बु. ) व चिमटा या ग्रामपंचायतीची आज दुपारी ग्रामसभा पार पडली यामध्ये कवठा व चिमटा वासियांनी आमच्या गावाच्या परवानगी शिवाय पाटबंधारे विभाग , महसूल विभाग व पुनर्वसन विभाग या विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने गावात प्रवेशच करू नये असा एकमुखी ठराव घेतला आणि ग्रामसभेमध्ये शेतीची व गावाची मोजणी व इतर निम्न पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कसलेही काम करू न देण्याचा संपूर्ण गाव वासियांनी एक मतांनी ठराव पारित केला.

सरपंच भाग्यश्री अरविंद शिडाम, सुरज शिरपुरे , स्वप्निल ठाकरे, तुकारामजी गावंडे, अमित ठाकरे, ज्ञानेश्वर जुनगरे ,आकाश गावंडे, श्रावण पुस्नाके , संदीप आत्राम, दिलीप नकाते, पांडुरंग शिडाम, विलासराव जुनघरे , रघुनाथ ठाकरे, रघुनाथ भोयर , रामकृष्ण किनाके व इतर अन्य मान्यवर व महिला मंडळींनी ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

आजच्या या ग्रामसभेमध्ये गावातील धरणविरोधी संघर्ष समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली.

कवठा व चिमटा येथील गावकऱ्यांनी जो एकमुखी निर्णय घेतला त्या निर्णयाचे स्वागत धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप , मुबारक तंवर, प्रल्हादराव गावंडे सर, विजय पाटील राऊत ,मिलिंद पाटील शिंदे , शेषराव मुनेश्वर, बाबाराव मेश्राम यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन केले व आभार मानले.

बुडीत क्षेत्रातील सर्व गावांनी कवठा व चिमटा गावाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अशाच प्रकारचे ठराव आपापल्या ग्रामसभेत पारित करावे आणि निम्न पैनगंगा प्रकल्पाला एकमुखी विरोध करावा असं जाहीर आव्हान धरण विरोधी संघर्ष समितीने केले आहे.

Copyright ©