यवतमाळ सामाजिक

कोडपाखेंडी येथे साथरोगाची लागण.आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.

प्रतिनिधी डोंगरखर्डा प्रदीप जांभूळकर

कोडपाखेंडी येथे साथरोगाची लागण.आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.

निवासी कॅम्प लावण्याची मागणी.

येथुन जवळच असलेल्या कोडपाखेंडी येथे साथरोगाची लागण लागली असल्याने रुग्णाच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे.

मुसळ ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोडपाखेंडी या गावात पंचावन ते साठ घराची वस्ती असुन शंभर टक्के येथे आदिवासी कोलम समाज बांधव वास्तव्यास आहे.

एकाही घरी रुग्ण नाही असे घर आजच्या घडीला या दिसणार नाही ही अवस्था या गावाची झाली आहे.

सदर गावातील वातावरण अस्वच्छमय असुन पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूने पूर्णतः गंधागी पसरली आहे.

घरो घरी ताप, हातपाय कंबर, डोके दुखी, खोकला या जबर दुखण्याने वयोवृध्द युवक व चिमुकली बालके सुध्दा त्रस्त झाले आहे, कोडपाखेंडी हे गाव मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अख्ताऱ्यात येत असुन येथील रुग्णांना योग्य ती आरोग्यसेवा मिळत नसल्याने त्यांना ना इलाजने खाजगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे,ज्यांची आर्थिकस्थिती हलाखीची आहे त्यांना घरीच उपचाराअभावी बसावे लागत असल्याने प्रकृतीत अधिक बिघाड होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

सध्याची स्थिती पाहता या गावाला आरोग्य विभागाद्वारा आरोग्य कॅम्प लावुन त्यांना योग्य ती सेवा मिळणे गरजेचे आहे अन्यथा गावात साथ रोगाचे रुग्ण संख्येत अधिक वाढ होत असल्याचे पाहून ग्रामस्थ धास्तावले आहे.

आरोग्य विभागाने या महत्त्वपूर्ण विषयाची दखल घेत निवासी कॅम्प लावुन रुग्णांना योग्य ती सेवा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Copyright ©