यवतमाळ सामाजिक

यवतमाल का राजा चे भव्य दिव्य शोभा यात्रेने आगमन

यवतमाल का राजा चे भव्य दिव्य शोभा यात्रेने आगमन

जल जीवालयात श्री ची स्थापना

मागील 60वर्षापासून यवतमाळ शहरातील सुप्रसिद्ध नवयुवक गणेश उत्सव मंडळ, मारवाडी चौक येथील “यवतमाल का राजा सेवा परिवार ” च्या वतीने यावर्षीसुद्धा गणेश उत्सवानिमित्त

“यवतमाल का राजा” ची स्थापना करण्याकरीता भव्य शोभायात्रा मारवाडी चौक येथून प्रारंभ झाली या शोभायात्रेमध्ये शिवराज ढोलपथक यवतमाळ, दिलीप बँज्यो पार्टी यवतमाळ, शौर्य पथक प्राचीन युद्ध काल, बाभुळगांव, उजैन्नचे भव्य राम रमैय्या पार्टी, जोधपूर येथील आदिवासी नृत्य एवं कॉमेडी टीम तसेच इंदोर येथील विशाल महाकाल शंकरजी व अघोरी टीम, इंदोर येथील महाबली हनुमानजी व वानसेना, दिल्ली येथील नवदुर्गा ग्रुप, जसलमेर राजस्थान येथील पारंपारिक वेशभुषा एवंम नृत्य `यवतमाल का राजा’ परिवारातील परंपरागत ध्वजा घेऊन ३० महिलांचा गट या व्यतिरिक्त अनेक आकर्षक दिखावे या शोभायात्रेत होते ही शोभायात्रा मूर्तीकार वनकर बंधु तलाव पैâल येथून प्रारंभ होऊन गणेश चौक, नेहरू चौक, तहसील चौक, नेताजी चौक, जुन बसस्टेशन, दत्त चौक, जाजू चौक, आठवडी बाजार, शनिमंदिर चौक मार्गक्रमण करीत मारवाडी चौक येथे साकार करण्यात आलेल्या जल जीवालंयात यवतमाल चा राजा” ची विधीवत स्थापनाकरण्यात आली. शोभयात्रे दरम्यान यवतमाळ का राजा ची आरती ओवाळण्यात आली,. मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले गणपती बाप्पा चे जय घोषने यवतमाळ शहर दुमदूमले जागो जागी रांगोळी काढून स्वागत करण्यात आलें

Copyright ©