यवतमाळ सामाजिक

” महाराष्ट्री असावे : महंत राष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र :” हेच सर्वज्ञ चक्रधरांचे भाषा व प्रदेशाबद्दल प्रेम- डॉ अनंतकुमार सूर्यकार

” महाराष्ट्री असावे : महंत राष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र :” हेच सर्वज्ञ चक्रधरांचे भाषा व प्रदेशाबद्दल प्रेम- डॉ अनंतकुमार सूर्यकार

( सर्वज्ञ अष्टशताब्दी अवतार दिन महोत्सव)

श्री गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ ( तरोडा ), ता. जि. यवतमाळ, नोंदणी क्रमांक एफ -२०९३८ च्या वतीने महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक सर्वज्ञ माहात्मा चक्रधर स्वामी यांचा ‘ अष्टशताब्दी अवतार दिन ‘ उत्सव व भगवान विश्वकर्मा यांचा पूजन दिन राजेश खेरे यांचे आवारात मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निर्मित सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना गीत, नामधून, सामूहिक नामजप, शांतिपाठ व आत्मचिंतन सामुदायिकरित्या घेण्यात आले. या उत्सवाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक अशोक खेरे यांचे हस्ते तसेच उपस्थित गुरुदेव उपासकांनी सर्वज्ञ माहात्मा चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले विशेष , विठू माउली, भगवान विश्वकर्मा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून सुगंधी पुष्पमाला अर्पण केली.

महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ माहात्मा चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने उपदेशक अशोक खेरे यांनी महानुभाव तत्त्वज्ञान आणि आचरण याविषयी चर्चा केली.

भडोचच्या प्रधान पुत्राचा म्हणजे हरपाळदेवाचा आकस्मिक झालेला मृत्यू व प्रधान विशाळदेवाचा पुत्रवियोग ही बाब लक्षात घेता श्रीकृष्णाचे तृतीय अवतार चक्रपाणि अर्थात चांगदेव राऊळ यांच्या आत्म्याने हरपाळदेवाच्या शरीरात प्रवेश केला आणि हरपाळदेव जिवंत झाले. रिद्धपुरचे गोविंद प्रभुंच्या नेत्रातून मिळालेल्या शक्ती व ऊर्जेतून हरपाळदेव संसारपाशातून मुक्त झाले व इथेच त्यांना गोविंदप्रभूंनी चक्रधर हे नाव दिले. चक्रधरांनी भारतभ्रमण केले. अनेक शिष्य निर्माण केले. तत्कालीन सामाजिक, धार्मिक व दंभाचाराचे सूक्ष्म अवलोकन केले आणि जनतेला समतावादी विचारांचा महानुभावीय मार्ग दाखविला.मराठी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देणारे ते पहिले समाजसुधारक होते. ते म्हणतात – ” कन्नड देशा : तेलंग देशा : न वचावे : ते विषय बहळचि देशच गा : महाराष्ट्री असावे : महंत राष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र : ” इतके महाराष्ट्राबद्दल व मराठी भाषेची आस्था बाळगणारे माहात्मा चक्रधर होते. भगवान विश्वकर्मा यांचीही कार्यप्रणाली विषद केली.

सर्वज्ञांच्या चरित्राविषयी डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी (वारकरी संप्रदाय व महानुभाव संप्रदायाचे गाढे अभ्यासक ) माहिती प्रस्तुत प्रसंगी दिली.

अशोक खेरे, नारायण सूर्यकार, विठ्ठल कोडापे, रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, गणेश सोनवणे, प्रकाश राऊत, परशराम चव्हाण, विजय राऊत, राजेश खेरे, गणेश खेरे, संजय जाचक, साहील खेरे, देवा पोहोरकर, पंडित काळे, वैशाली खेरे, जिजाऊ गाडगे ,प्राची खेरे, नलिनी राऊत, सानिका खेरे, राधिका खेरे, दत्ता इंगळे, दीपक हारे , डॉ अनंतकुमार सूर्यकार, बंटी राऊत, ताराचंद चव्हाण, सुमित्रा मोडले, राधा मोडले, बहिणाबाई कोडापे, नैतिक सहारे, प्रतीक पाटील आणि बहुतांश गावकरी प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण सोनटक्के यांनी तर आभारप्रदर्शन गणेश खेरे यांनी केले. सर्वज्ञांच्या आरतीने व प्रसाद सेवनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Copyright ©