यवतमाळ सामाजिक

सुनिल चव्हाण यांच्या गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

सुनिल चव्हाण यांच्या गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

साप्ताहिक, बापू तेरे देश मे, च्या वतीने दि.17 सप्टेंबर 2023 ला मराठवाडा मुक्ती दिना निमित्त तहसील कार्यालयाच्या भव्य अशा पटांगणात संस्कृतिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे अध्यक्ष जहीर खान होते तर प्रमुख अतिथी म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्री चे डायरेक्टर फहीम सरकार.हरी दर्शन वाड .सुरेश शेंडे व पाटील हे होते.या कार्यक्रमात जिव्हाळा कला संच चे गायक तथा सिनेकलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगांव तह.आर्णी जी. यवतमाळ यांनी स्त्री व पुरूष च्या आवाजात गीते गाऊन श्रोते मंडळींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले सोबत सय्यद वली.शेख वकील .संजय पवार . गांगेश्वर आण्णा. हरबंस कौर व प्रतिभा पाटील यांनी सुध्धा दर्जेदार गाणी सादर केली कु.प्रणिता वानोळे या विद्यार्थिनीने माराठवाडा मुक्ती दिना निमित्त सुंदर असे प्रास्ताविक केले .कार्यक्रमाचे आयोजन एस.अहमदअली यांनी केले होते तर संचालन ईमरान अली यांनी केले या वेळी बरीच रसिक मंडळी हजर होती.

Copyright ©