यवतमाळ सामाजिक

“पोळ्यांच्या दिवशी सापडला 8 फुट अजगर साप”

“पोळ्यांच्या दिवशी सापडला 8 फुट अजगर साप”

शिवाजी नगर परिसरातील रहिवाशी राजू पुडके यांच्या घराच्या आवारात असलेल्या जलतन या मध्ये मोठा साप रात्री सुमारे 11.30 ला जाताना परिसरातील लोकांना दिसला तेव्हा त्यांनी त्याची माहिती सर्पमित्र आदेश आडे ला दिली. ते त्यांचे सहकारी सर्पमित्र सोबत सिद्धांत तुल,दयानंद आडे, राजू देवकर यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले, साप मोठा असल्या कारणाने त्यांनी एम एच 29 चे तालुका अध्यक्ष संदीप लोहकरे यांना पण बोलवून घेतले सर्पमित्रनि त्या सापाला एक तासाच्या अथक प्रयत्नाने पकडले व झोळी बंद केले व परिसरातील नागरिकांना पकडलेल्या सापा बदल माहिती दिली व भयमुक्त केले. पकडलेल्या सापाची लांबी अंदाजे आठ फुट व वजन दहा किलो असेल.

अधिक माहिती देताना सर्पमित्र, प्राणि मित्र संदीप लोहकरे असे सांगतात की पकडलेल्या हा साप भारतीय अजगर (इंडियन रॉक पायथान) असून त्याचा रंग राखाडी किंवा फिकट तपकिरी रंगावर गडद तपकिरी धबे असतात. शरीर स्थूल खवले मऊ डोळ्यातल्या बाहुल्या उभ्या, शेपूट आखूड असते पाल्या पाचोळ्याचा ढिगारा करून मादी त्यात 20 ते 80 अंडी घालते 90 ते 100 दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. पिल्लांची लांबी साधारणतः 30 से मी असते. त्याचे खाद्य उंदीर, घूस अश्या छोट्या प्राण्या पासून ते माकड, कोल्हा, कुत्रा असे मध्यम आकाराचे प्राणीही खाण्याची उदाहरणे आहेत. भारतात सर्वत्र जंगला पासून माळराना पर्यंत कुठेही आढळून येतो.

पकडलेल्या भारतीय अजगरला वनविभागाचे वनरक्षक आर आर लोखंडे, शुभम मेंढे व एम एच 29 चे राळेगाव तालुक्यातील

मोहन देवकर, कारण नेहारे, गौरव खामकर, अक्षय काकडे, गणेश राखून

सूरज पवार, तेजस्विनी मेश्राम, नम्रता आगरकर यांच्या उपस्थितीत लोणी येथील निसर्गाच्या सान्निध्यात जंगल परिसरात सोडण्यात आले व राळेगाव आणि तालुक्यातील नागरिकांना सापाला ना मारता असा कुठल्याही प्रकारचा वन्यजीव आढळून आल्यास वनविभागाच्या टोल फ्री. क्रमांक 1926 किंवा राळेगाव तालुक्या साठी संस्थेच्या 95 61 905 143 या क्रमांकावर संपर्क करावा अशे आवाहन प्राणी मित्र संदीप लोहकरे यांची केले आहे.

Copyright ©