यवतमाळ सामाजिक

निम्न पैनगंगा धरण विरोधी समितीची महत्वाची बैठक

सावळी सदोबा आशिफ खान

निम्न पैनगंगा धरण विरोधी समितीची महत्वाची बैठक

निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने कापेश्वर येथील कपिलेश्वर मंदिरावर दिनांक 17 सप्टेंबर रविवार रोजी दुपारी 12 वाजता धरणविरोधी संघर्ष समितीची अतिशय महत्त्वाची व तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप यांनी सांगितले आहे.

सरकार निम्न पैनगंगा प्रकल्प करण्याच्या दृष्टीने वेगवान हालचाली करत आहेत, जमिनी विकत घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे, पहिला टप्यातील गावांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करीत असल्यानेत्या धरण विरोधी आपला हा लढा भविष्यात कसा असला पाहिजे ? आपण काय केलं पाहिजे ? कशा पद्धतीने पुढची लढाई लढली पाहिजे ?:धरण विरोधाची काय दिशा असली पाहिजे ?

या व अशा अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचा आयोजन करण्यात आले असून विदर्भ मराठवाड्यातील बुडीत क्षेत्रातील शेतकरी ,शेतमजूर बांधवांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंवर व कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर यांनी केले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©