यवतमाळ सामाजिक

श्री चक्रधर स्वामी अवतार दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्री चक्रधर स्वामी अवतार दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्रीदत्त मंदिर हिवरी( हेटि)येथील २१ सप्टेंबर २३ ला श्री चक्रधर स्वामी अवतार दिनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यात पंचावतार उपहार,स्वामींची भव्य शोभा यात्रा या मध्ये विविध कलाकारांना पाचारण करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सभा अध्यक्ष आचार्य प्रवर प पू प म श्री लाडबाबा हरसूल,कार्याध्यक्ष कवीश्वर कुलभूषण, आचार्या त. प्रेमिला अक्काजी पंजाबी जामवाडी,प्रमुख व्याख्याते व्याख्यान महर्षी आचार्य प्रवर दिंगाबरमुनी बाबाजी अंकुळणेरकर वडनेर भुजंग,प्रमुख उपस्थिती प पू प म श्री धनंजय बाबाजी पंजाबी जामवाडी सत्कार मूर्ती प पू प म श्री शहापुरकर येरला नागपूर,प्रमुख मार्गदर्शक प पू प म श्री गोविंदराज बाबाजी रिद्ध्यपुरकर श्री क्षेत्र जवळा ( खांड) प्रमुख पाहुणे संजय भाऊ राठोड राज्याचे जल व मृद संधारन मंत्री तथा पालक मंत्री वॉशिंग – यवतमाळ शाम भाऊ जयस्वाल माजी.उपाध्यक्ष जी प यवतमाळ.नितीनभाऊ मिर्झापूरे जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना या यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य अवतार उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे यात शोभा यात्रे नंतर ९ वाजता भजन संध्या सादर करते,मेरे चक्रधर, मेरे शाम भजन संध्या टिव्ही स्टार, भजन सम्राट भूषण जाधव नागपूर.तर सकाळी प्रसन्नमुनी दादा दर्यापुरकर अर्चना ताई गायकवाड यांचे भजन, किर्तनाचार्य दादाराव जी उके,प्रेरित,नेर ग्रामीण महानुभाव मंडळ, दारव्हा तालुका महानुभाव मंडळ,दिग्रस महानुभाव मंडळ हे उपस्थित राहणार असून या वेळी सन्यास दीक्षा विधी यात शशिकला बाई भूर्मुसे यांना दीक्षा देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन सर्वज्ञ युवा मंडळ यांनी केले आहे.

Copyright ©