Breaking News

कस्तुरी मंच तर्फे 15 सप्टेंबर रोजी तान्हा पोळ्याचे आयोजन

कस्तुरी मंच तर्फे 15 सप्टेंबर रोजी तान्हा पोळ्याचे आयोजन

ज्ञानेश्वर मंदिर संस्थान यवतमाळ व कस्तुरी मंच यवतमाळ च्या वतीने दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता तान्हा पोळ्याचे आयोजन संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान प्रांगण चापमनवाडी येथे केले आहे

तान्हा पोळा निमित्त बालगोपालांना अनेक रोख पुरस्कार देण्यात येणार आहे बाल गोपालांनी सजविलेल्या बैलांना प्रथम पुरस्कार 2001 रुपये अमोल देशमुख यांच्या वतीने तर द्वितीय पुरस्कार 1101₹ विजयकुमार बुंदेला अध्यक्ष महावीर युथ फाऊंडेशन यवतमाळ तर्फे 901₹ तृतीय पुरस्कार सुहास सावरकर श्री स्वामी समर्थ केंद्र यवतमाळ तर प्रोत्साहन पर 701रुपयाचे पुरस्कार डॉक्टर अशोक ढोक 501 रुपयाची रोख पुरस्कार राजेश शिरभाते 301 रुपयाचे रोख पुरस्कार संजय सावरकर यांची तर्फे बाल गोपालांनी सजविलेल्या आकर्षक बैल जोडीच्या विजय स्पर्धकांना देण्यात येणार आहे

पुरस्कार वितरणा प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभु दाजी शिरभाते महाराज तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक अवधूतवाडी यवतमाळ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड माझी ज्येष्ठ नगरसेवक अमोल देशमुख महावीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार बुंदेला श्री स्वामी समर्थ केंद्राचे सुहास सावरकर आदी मान्यवर पुरस्कार वितरणासाठी उपस्थित राहणार आहे

या कार्यक्रमाला प्रकाश किराणा चे संचालक प्रकाश कक्कड. गजानन शिरभाते ज्ञानेश्वर मंदिर संस्थानाचे अरुण भाऊ शिरपूरवार सुधीर कैपील्यवार आदींचे विशेष सहकार्य लाभत आहे

या तानपुराच्या कार्यक्रमाला बाल गोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान कस्तुरी मंचच्या अध्यक्षा दिशा निलावार तान्हा पोळा संयोजिका किरणताई शिरभाते वर्षाताई लोखंडे जयश्री बोबडे रितू गायकवाड संगीता पुरी. मनीषा वानखेडे आदींनी केले आहे.

Copyright ©