यवतमाळ सामाजिक

आदर्श शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ येथे पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न.

आदर्श शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ येथे पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न.

स्थानिक आदर्श शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ येथे पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक मा.सैय्यद वसीम सर उपस्थित होते. डॉ रामसिंह येवतीकर सर,डॉ.रवींद्र कडू सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या भोयर मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांचे सत्कार आणि स्वागत करण्यात आले. भक्ती जोशी यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. लगेचच पदवी वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. अमित ओळंबे, मंजिरी गोळे, मेहविश खान, नयन पेंदोर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्व.गोविंदराव पाटील अध्यापक महाविद्यालय, दारव्हा येथील डॉ. काळे यांनी आपले शिक्षण विषयक विचार प्रकट केले. अध्यक्षीय भाषणामध्ये मा.सैय्यद वसीम सर यांनी आपल्या वक्तव्यामध्ये शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अतिथी डॉ. रामसिंह येवतीकर सर यांनी शिक्षणाचे मानवाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर शिक्षक कसा असावा- हुशार, उत्तम स्वास्थ,भावनिक स्थिरता, उत्साह,संयम आणि सहिष्णुता हे गुण शिक्षकांमध्ये असणे आवश्यक आहे.अशा प्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थ्यांना केले.डॉ.रवींद्र कडू सर यांनी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना भावी जीवनामध्ये यशस्वी होण्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या भोयर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्यासह चांगले संस्कार एक शिक्षक देत असतो. एका विद्यार्थ्याला घडविण्याची फार मोठी जबाबदारी शिक्षकाची आहे आणि हेच गुण भावी शिक्षकांमध्ये असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संध्या भोयर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ.निता राऊत यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मनिषा क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रुद्रकुमार रामटेके यांनी केले. कार्यक्रमाला जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता आदर्श शिक्षण महाविद्यालय येथील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रिया अलोने, कांचन भोकरे, रूपाली भोयर, सीमा बनकर, कीर्ती सुरस्कर, तेजस हातगावकर, आशिष फावडे, योगेश चौधरी, तलाह सर, अख्तर खान चाचा जी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Copyright ©