यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कार विद्या मंदिर येथे अवतरले गोकुळ

सुसंस्कार विद्या मंदिर येथे अवतरले गोकुळ

कुणाच्या डोक्यावर मोरपंखी पिसारा व दंडावर बाजूबंद, कुणाच्या हातात बासरी…तर कुणाच्या हाती लोण्याचा माठ असा साजशृंगारामुळे सुसंस्कार विद्या मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सो. उषा कोचे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगी बोडखे व मेघा केवटे तसेच प्रायमरी करिता प्रमुख पाहुणे म्हणुन सौ.सुशिला नाईक,सौशुभांगी कोथुरकर ह्या लाभल्या. वेषभूषा स्पर्धा हि तीन विभागांमध्ये घेण्यात आली प्रथम अ विभागामधून आदी गुप्ता प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक श्रेयांशी निरगुडकर व तृतीय क्रमांक अबीर वानखडे यांनी पटकावला . ब विभागातून प्रथम क्रमांक पृथा काटकर द्वितीय क्रमांक स्वानंदी ऐतवार आणि तृतीय क्रमांक अद्विक चिरडे यांनी पटकावला क विभागामधून प्रथम क्रमांक अनन्या राठोड द्वितीय क्रमांक वेद मनोज राखे व तृतीय क्रमांक अंजली अहेर यांनी पटकावला

तसेच प्रायमरी विभागातुन प्रथम अ विभागामधुन कु. रौनक मेहरोलीया प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक कु. रकुल कुडमते आणि तृतीय क्रमांक कु. अंशिता गुप्ता यांनी पटकावला. व विभागातुन प्रथम क्रमांक कु. अपुर्वा श्रीराव, ,व्दितीय क्रमांक कु. क्षितीजा देहनकर आणि तृतीय क्रमांक कु. मनस्वी पिल्लारे यांनी पटकावला नटखट, गंभीर, खेळकर, खोडकर, बासरीवाला, दहिहंडीतील लोणी चोरणारा अशी बाल श्रीकृष्णाची अनेक रुपे वेशभूषेच्या माध्यातून साकारली गेली,स्पर्धेत बालगोपाळांच्या नटखट अदांवर सर्वच पालकवर्ग फिदा झाले.

कार्यक्रमानंतर दहीहंडी फोडून आणि काला प्रसाद व मुलांना खाऊ देवून जन्माष्टमी साजरी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा ठाकरे,रेखा घावडे व आभार प्रदर्शन प्रांजली राखुंडे,वैष्णवी बैस यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीते करण्याकरिता शाळेचे शिक्षक प्रांजली वऱ्हाडे शितल जाधव ,मोहित जयस्वाल, विनोद जाधव, रोशन माहुरे सौ. नलिनी नित, सौ. शर्वरी मारावार,

सौ. विद्या शिरभाते, वनिता जयस्वाल, हर्षदा बाभुळकर, सोनाली परडके व सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©