यवतमाळ सामाजिक

इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्स तर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोग निदान शिबिर आणि रोगावर मार्गदर्शन संपन्न.

इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्स तर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोग निदान शिबिर आणि रोगावर मार्गदर्शन संपन्न.

आज दि.9-9-23 रोजी इवा हॉस्पिटल ओम सोसायटी गेट मध्ये आर्णी रोड यवतमाळ येथे चेस्ट अँड एच आय व्ही/ एड्स क्लिनिक डॉ. अविनाश बोरीकर दमा श्वसन रोग व एड्स तज्ञ यांचे एड्स या विषयावर क्लब महिलांना जनजागृती आणि दमा श्वसन या रोगावर निदान आणि मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉ. आरती बोरीकर यांचे महिलांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे क्लबच्या महिलांना भरपूर फायदा झाला तसेच या शिबिराद्वारे क्लब ने सुद्धा माणसा माणसात जनजागृती करावे असे बोरेकर सरांनी आव्हान केले. तसेच डॉ. हरीश तांबेकर बालरोग तज्ज्ञ, यानी मुलांच्या आरोग्याची काळजी कशी करावी आणि पोषक आहार बद्दल मार्गदर्शन केले. त्यामुळे क्लबला मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने क्लब कडून क्लबच्या सदस्या डॉ.सुधा खडके , पूजा राऊत , शितल कळस्कर मॅडम, संगीता पेंदोर , भाविका भगत या पाच महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच हा प्रोजेक्ट ज्यांनी अरेंज केला त्या क्लबच्या सदस्या सौ अनघा देशमुख यांनी परिश्रम घेतले त्यामुळे क्लब तर्फे त्यांचा सत्कार घेतला .यावेळी क्लबचे अध्यक्ष प्रतिभा मुळे यांनी क्लब बद्दल गौरव व्यक्त केला. यावेळी क्लबचे अध्यक्ष प्रतिभा पवार मुळे, सचिव अबोली डीक्कर देशमुख, उपाध्यक्ष संगीता पुरी, सहसचिव सुधा खडके मॅडम, कोषाध्यक्ष स्मिता दुर्गे, आयएसओ भाविका भगत,सह कोषाध्यक्ष साधना नागपाल, एक्झिक्युटिव्ह मेंबर संगीता पेंदोर, बबीता तोडसाम, पूजा राऊत, शितल कळसकर, अनघा देशमुख, स्नेहल रेचे, वैशाली पिसाळकर आदीं सदस्य उपस्थित होते.

Copyright ©