महाराष्ट्र राजकीय

आगामी निवडणुका आर पी आय (ए) स्वबळावर लढणार विदर्भ संघटक- मंगेश चोरे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी

आगामी निवडणुका आर पी आय (ए) स्वबळावर लढणार विदर्भ संघटक- मंगेश चोरे

आज झालेल्या विदर्भ अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर आणि पदाधिकारी यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला असून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आर.पी.आय (ए) पक्षाकडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय पक्षांमध्ये असलेल्या अस्थिरतेला महत्त्व देऊन बहुजन समाजाच्या हितार्थ जनसामान्यातून आर.पी.आय(ए) पक्षाला जनसामान्यातून मिळत असलेल्या प्रतिसादाला बघून राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे व राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद तसेच नगरपरिषद स्वबळावर लढण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. निर्णयाला जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला असून आगामी निवडणुका लढविण्याकरिता पक्ष सज्ज झाला आहे. असे विदर्भ संघटक मंगेश चोरे यांनी कळविले आहे. आगामी निवडणुकीला महत्त्व देऊन तळागाळातून पक्ष बांधणीच्या कामाला. कार्यकर्त्यांनी हातभार लावावा असे आवाहन मंगेश चोरे. विदर्भ संघटक. तसेच विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी कळविले आहे.

Copyright ©