यवतमाळ सामाजिक

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात दिक्षारंभ समारंभ संपन्न

बाभुळगाव: प्रतिनिधी

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात दिक्षारंभ समारंभ संपन्न

दि. ०९ सप्टेंबर २०२३: स्थानिक भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करने व त्यांना महाविद्यालयातील विविध घटक, सोई-सुविधा आणि कार्यपद्धतीचा परिचय करून देण्याच्या अनुषंगाने दिक्षारंभ समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे, शिक्षक दिनाचे औचित्य साधून, दि. ०५ ते ०८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विविध सत्रांमध्ये सलग चार दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. ०५ सप्टेंबर २०२३ ला या कार्यक्रमाचा उदघाट्न सोहळा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य, डॉ. प्रतिभा काळमेघ यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. संतोष आगरकर, प्राचार्य, इंदिरा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, राळेगाव यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी मंचावर शिक्षक दिनानिमित्य आयोजित स्वयं-शासन कार्यक्रमाच्या समन्वयक प्रो. डॉ. कल्पना कोरडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

दि. ०६ सप्टेंबर २०२३ च्या पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध शाखा, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा परिचय करून देण्यात आला. दुसऱ्या सत्रात नवप्रवेशित विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. चंद्रकांत सरदार यांनी ‘महाविद्यालयाची नीती-मूल्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर तिसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभाग, सोई-सुविधा व उपक्रम याविषयी सखोल माहिती देण्यात आली. नंतरच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने महाविद्यालयाचे ग्रंथपाल, डॉ. संजय शेणमारे यांचे मार्गदर्शनात महाविद्यालयाचा आत्मा म्हणजेच ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्राला भेट दिली. ह्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन ग्रंथालयातील ग्रंथसंपदा, ग्रंथालयीन सेवा-सुविधा, ई-रिसोर्सेस, ई सेवा-सुविधा बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तर दुसऱ्या गटाने प्रा. डॉ. विकास टोणे यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील जिमखान्याला भेट देऊन जिमखान्याबद्दल माहिती जाणून घेतली. तर याच दिवशी अंतिम सत्रमध्ये प्रो. डॉ. प्रतिभा काळमेघ यांनी फन अँड प्ले अंतर्गत पिक उप दि बॉटल या खेळाचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

दि. ०७ सप्टेंबर २०२३ ला विद्यार्थ्यांची लिखाणातील अभिरुची वाढविन्याच्या हेतूने प्रा. डॉ. गजानन माने यांनी विद्यार्थ्यांना ‘सर्जनशील लेखन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. सुधीर त्रिकांडे यांनी प्रसिद्ध न्यूरो तज्ञ डॉ. करंदीकर यांचेशी संपर्क साधून त्यांचे ‘ध्येय निश्चिती’ या विषयावर ऑनलाईन रेकॉर्डेड लेक्चर विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर दाखवले. तिसऱ्या सत्रात प्रो. डॉ. कल्पना कोरडे, प्रा. मोकळकर मॅडम, प्रा. मसराम मॅडम व प्रा. मातीरे मॅडम यांचे मार्गदर्शनात आयोजित ‘एक मिनिट शो’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. अंतिम सत्रात विद्यार्थ्यांनी गटानुसार महाविद्यालयाचे ग्रंथालय व जिमखान्याला भेट दिली.

दि. ०८ सप्टेंबर २०२३ ला प्रा. डॉ. निलेश सुलभेवार यांनी पहिल्या सत्रात प्रा. डॉ. वामन विरखडे यांचे अध्यक्षतेखाली ‘ऑनलाईन शिक्षणाच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. विकास टोणे संचालक शारीरिक शिक्षण यांनी ‘योगा व ध्यान या माध्यमातून तणाव मुक्ती’ या विषयावर विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकासह उदबोधन केले. तर नंतरच्या सत्रात, विविध विषयांवर आयोजित गटचर्चेमधे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या दिक्षारंभ समारंभाचे शेवटचे सत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोटुरवार यांच्या अध्यक्षतेखाली व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी तथा स्व. माणिकरावजी पांडे विद्यालय, बाभुळगाव येथील मुख्याध्यापिका जयश्रीताई काळे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी मंचावर दीक्षारंभ कार्यक्रमाच्या समन्वयक प्रो. डॉ. प्रतिभा काळमेघ प्रामुख्याने उपस्थित होत्या. या प्रसंगी कु. ऋतुजा भोयर व कु. देवयानी मोने यांनी महाविद्यालयात आयोजित दिक्षारंभ समारंभाविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी जयश्रीताई काळे यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिक्षारंभ समारंभादरम्यान आयोजित विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्यप्राप्त विध्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयात बी. ए., बी. कॉम., व बी. एस्सी. भाग १, चे नवप्रवेशित विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रा. सुनील ईश्वर, प्रा. डॉ. चंद्रशेखर ठाकरे, प्रो. डॉ. युवराज मानकर, प्रा. भूषण घनमोडे, श्री. संजय मदने, श्री. मधुकर जाधव तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Copyright ©