यवतमाळ राजकीय

जनसंवाद यात्रेत जनसामान्यांच्या जाणल्या जनभावना अकोला बाजार येथे बाळासाहेब मांगुळकर यांचा शेतकऱ्यांशी संवाद

अकोला बाजार : प्रवीण राठोड.

जनसंवाद यात्रेत जनसामान्यांच्या जाणल्या जनभावना अकोला बाजार येथे बाळासाहेब मांगुळकर यांचा शेतकऱ्यांशी संवाद

शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांच्या समस्या, सरकारच्या धोरणामुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलावरील अत्याचार या प्रश्नावर जन सामान्यासोबत हितगुज साधण्यासाठी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी यवतमाळ विधानसभा क्षेत्रात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी केले. शुक्रवारी सकाळी चपडोह, बोधगव्हाण , धानोरा , सावरगड , रातचांदना , पांढरी , घोडखिंडी , मुरझडी, अकोला बाजार, बारडतांडा, बारड , बोरींसिंह, रुई, वाई, बेलोरा, मंगरूळ या गावात जनसंवाद यात्रा पोहचली. ठीकठिकाणी संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाळासाहेब मांगुळकर यांनी शेतकरी, मजुर , विद्यार्थी, दिव्यांग महिला , बेरोजगार आदींच्या जनभावना जाणुन घेतल्या. कामठवाडा येथील रमेश सादु पवार या शेतकऱ्याने अकोला बाजार येथे आपली समस्या बाळासाहेब मांगुळकर यांच्यासमोर मांडली. या जनसंवाद यात्रेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक , रमेश भिसणकर , गोविंद वंजारी , ब्रम्हानंद काळे, वासुदेव गुघाने , सुहास सरगर , उमेश चोरमले , हरिद्वार खडके , जाकीर काजी, संजय गोडे, दिलीप हुकरे , महादेव तांगले , अनिल राठोड , संतोष वानखडे , डॉ. कृष्णा कावळे , पांडुरंग कराळे , शेख जब्बारभाई , भालचंद्र कलाने , विजय डाखोरे , नरेंद्र जगताप, सीताराम आडे, विजय जाधव , काशीराम राठोड आदी काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Copyright ©