यवतमाळ सामाजिक

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

यवतमाळ, दि. ७ (जिमाका):- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेचे पूर्व तयारी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी मिळविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व युवतींसाठी दि. ३ ते १२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचा कोर्स चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.

मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील एसएसबी ५४ कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या किंवा ९१५६०७३३०६ या व्हाट्सॲप क्रमांकावर एसएसबी ५४ असा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करून दिले जाईल. शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रत भरुन सोबत आणावे.

एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. त्यानुसार कंबाइंड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेले असावे व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी (सी) सर्टिफिकेट ए/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रूप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी

शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. पात्रता प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकचे प्रभारी अधिकारी यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com , दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 व भ्रमणध्वनी क्रं ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायं 5.30 पर्यंत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.

Copyright ©