यवतमाळ सामाजिक

न.प.प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर चार दिवसानी अमर नरोडे यांचे उपोषण मागे

न.प.प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर चार दिवसानी अमर नरोडे यांचे उपोषण मागे

माजी मंत्री संजय देशमुख यांनी शीतपेय पाजून उपोषण सोडविले

दिग्रस शहरात मुतारी प्रश्न हा सर्व सामान्य माणसाच्या जीवारी लागलेला प्रश्न असुन या विषयी नागरिकातून नगर परिषद ला अनेक तक्रारी दिल्या गेल्या असुन न.प.प्रशासना कडून कुठलीही दखल न घेतल्याने या गंभिर विषया कडे लक्ष वेधून घेण्यासाठी तरुणांना उपोषण करण्याची वेळ येत आहे. या पूर्वी मुतारी प्रश्न घेउन तीन उपोषण झाले असुन तात्पुरते समाधान करण्यात आले होते. मुतारी ची समश्या जैसे थे तैसे असल्याने संताप व्यक्त करीत अमर नारोडे या तरुण समाजसेवकाने .न.प. ला दिनांक २९/८/२०२३ रोजी निवेदन देउन मुतारी ची समश्या सोडवावी व ही समस्या न सोडविल्यास दिनांक ४/९/२०२३ पासुन साखळी उपोषण ला बसण्याचा इशारा दिला होता व ते दिनांक ४ पासून आज दिनांक ७ पर्यंत सतत ४दिवस उपोषण करित होते यांच्या उपोषणाची दखल घेत नगर विकास अभियंता सोमिनाथ सतगर यांनी मुतारी प्रश्न लवकरच मार्गी काडू असे लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली असता उपोषण कर्ते अमर नरोडे यांनी आपले उपोषण मागे घेतले या वेळी माजी राज्य मंत्री संजय देशमुख सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Copyright ©