यवतमाळ सामाजिक

शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा करपा रोगाने केले अतिक्रमण

शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा करपा रोगाने केले अतिक्रमण

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली असताना, निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांचा घात करतोय यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर करपा रोगांचा वाढता प्रादुर्भाव वाढत आसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे सध्या सोयाबीन पिकावर करपा रोगाने थैमान घातले असून हिवरी येथील शेतकरी योगेश काकस यांच्या तीन एकर शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट झाले आहे याच्या शेतातील सोयाबीन च्या एका झाडाला सोयाबीनच्या शेंगा ह्या अडीचशे ते तीनशे शेंगा होत्या करपा रोगाचा वाढता प्रादुर्भाव होताच पूर्णतः शेंगा गळण्यास सुरुवात झाली आहे सर्व सोयाबीन पिवळे होत असताना महागा चेही औषध मारून कोणताही फायदा झालेला नसल्याचे शेतकऱ्यानं कडून सांगण्यात yetaaheamjzz शेतकऱ्यांना या रोगाने हवालदिल केले आहे करपा रोगाचा प्रादुर्भाव आणि शेंगाची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे शेतकरी राजावर संकट येतात शेताची पाहणी कृषी विभागाने तातडीने करून झालेल्या नुकसानाची मदत देण्याची मागणी परिसरात जोर धरत आहे खरिपातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे प्रथम पावसाने कहर केला अनेक नाल्यात शेजारी असलेल्या शेतात तर वाहून गेल्याच परंतु अनेक बांधून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील पीक वाहून गेले कसे पैसे कर्ज बिल्डर काढून शेतकऱ्यांना विकास नवसर्जन्य नवस संजीवनी दिली मात्र नुकताच करपा रोगाने आक्रमण केले तर पराटीवर बोंड अळीच्या आक्रमण झाले. शेतकऱ्यांनी कराव तर काय याची शासनाने दखल घेणे गरजेचे आहे गतवर्षी खरीप पिकाचे नुकसान होऊन यंदा सोयाबीनच्या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला तालुक्यात बाजारपेठ आणि नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनला प्राधान्य देत आहे मात्र माय जिओ देत नाही बाप खाऊ देत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे सध्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे यावर कुठलेही औषध काम करताना दिसत नाही प्रत्येक सोयाबीनचे पाणी पिवळे पडत आहे आता शेतकऱ्यांसमोर कोणताच पर्याय उरलेला नसल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून 80 टक्के शेतकरी सोयाबीनचे पीक घेत आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने फोड केली होती त्यानंतर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीची कामे करावी लागली आता सोयाबीन भरत असतानाच मुसळधार पाऊस आणि आता पावसाने उघड उघड देतात पाण्याची आवश्यकता असताना पाऊसही बरसला मात्र करपा रोग नाही गेला करपा रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासन आणि तातडीने दखल घेऊन नष्ट झालेले पिकाचे पाहणी करावी व शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्याला मृत्यूच्या दारात उभे राहायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती हिवरी रुई अकोला बाजार परिसरात निर्माण झाली आहे

Copyright ©