महाराष्ट्र सामाजिक

श्री.संत केजाजी कॉन्व्हेन्ट येथे गोकुळाष्टमी साजरी

प्रतिनिधी वर्धा पंकज तडस

श्री.संत केजाजी कॉन्व्हेन्ट येथे गोकुळाष्टमी साजरी

चिमुकल्यांनी साकारली राधा कृष्ण ची वेशभूषा.

सेलू नजीकच्या च्या घोराड येथील श्री संत केजाजी कॉन्व्हेन्ट घोराड येथे श्रीकृष्णा जन्मस्टी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी नर्सरी , केजी वण तसेच केजी टू च्या विद्यार्थ्यांनी कृष्ण तसेच राधा ची वेशभूषा परिधान करत या कार्यक्रमात सहभाग घेतला.शाळेच्या परिसरात दहीहंडी उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चिमुकल्यांनी दहीहंडी फोडत गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे संस्था संचालक तथा मुख्याध्यापक प्रशांत झाडे, शाळेतील शिक्षिका विद्या वांढरे, सुवर्णा पिसे ,शिवानी राऊत ,शोभा झाडे उपस्थित होते.

Copyright ©