यवतमाळ सामाजिक

यवतमाळ येथे भव्य राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलन

यवतमाळ येथे भव्य राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलन

६ ते ७ जानेवारी २०२४ ला भव्य आयोजन

(सदर बातमीमध्ये तीन फोटो घेणे) अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर

स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉ. लीला भेले तर

उद्घाटक श्रीमती रंजनाताई तोंडरे

साहित्य सांस्कृतिक अकादमी पुणे शाखा यवतमाळ जिल्हा द्वारा आयोजित यवतमाळ येथे येत्या ६ व ७ जानेवारी २०२४ ला भव्य राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक ,लेखक, भाष्यकार वक्ते विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ.अशोक पळवेकर यांची सर्वानुमते या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तसेच संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी झुंजार सामाजिक कार्यकर्त्या पुरोगामी विचारवंत व प्रभावी वक्त्या प्रा. डॉ. लीलाताई भेले यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या व विद्यार्थी प्रिय अध्यापिका तथा संपादिका श्रीमती रंजनाताई तोंडरे ह्या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटन समारंभ,परिसंवाद, प्रकट मुलाखत, व्याख्यान, कवी संमेलन, गझल मुशायरा, सांस्कृतिक कार्यक्रम व परिचर्चा यांची एकूण दहा सत्रे या संमेलनात संपन्न होणार आहे. प्रत्येक सत्रात किमान ५ ते कमाल २० मान्यवर आपले विचार मांडणार आहे. तथा आपली कला सादर करणार आहे, याशिवाय महाराष्ट्रातील दमदार कथाकाराच्या कथाकथनाचाही स्वतंत्र फड रंगणार आहे. वर्तमान विषयावरील सडेतोड भाष्य, भविष्यासाठी दिशादर्शन नागरिकांच्या हक्क व कर्तव्याची रोखठोक जाणीव आणि वर्तमानासाठी वर्तन संदेश ही प्रत्येक सत्राची विशेष वैशिष्ट्ये असतील. याशिवाय महाराष्ट्रातील सुविख्यात व निर्भीड वक्ते, पत्रकार निखिल वागळे यांचे ‘आजच्या सामाजिक व राजकीय स्थितीवरील जाहीर व्याख्यान होणार आहे.या संमेलनाचे ते विशेष आकर्षण असणार आहे.

या प्रसंगी मान्यवर प्रदीप झाडे, उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, प्रज्ञा फुलझेले ही ही प्रार्थना मंडळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाच्या आयोजनासाठी आतापर्यंत तीन बैठकी संपन्न झाल्या असून येत्या ६ ते ७ जानेवारी रोजी होणाऱ्या या भव्यदिव्य राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचा लाभ यवतमाळ जिल्हा, शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संमेलनाचे अध्यक्ष डॉ.बालकृष्ण सरकटे,कार्याध्यक्ष प्रमोद बाविस्कर, उपाध्यक्ष प्रा. घनश्याम दरणे, कल्पना मोताळे, सचिव विनय मिराशे ‘अशांत’, कोषाधक्ष नीलध्यज कांबळे व निमंत्रक तथा प्रवक्ते प्रा. अंकुश वाकडे तथा कार्यकारिणी पदाधिकारी इंजि. मनोहर शहारे, जयंतकुमार शेटे, आनंद कसंबे, मंगला माळवे, डॉ साहेबराव कदम, संतोष अरसोड, प्रा प्रवीण देशमुख, महेश अडगुलवार मृणालिनी दहिकर, सुरेश राउत, विजयकुमार गाडगे, भावना खोकले, महादेव कांबळे, व्ही. पी. पाटील, तथा प्रसिद्धी प्रमुख नारायण थूल यांनी केले आहे.

Copyright ©