यवतमाळ शैक्षणिक

आदर्श शिक्षण महाविद्यालय येथे शिक्षक दिन संपन्न

आदर्श शिक्षण महाविद्यालय येथे शिक्षक दिन संपन्न

स्थानिक आदर्श शिक्षण महाविद्यालय येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक मा. सैय्यद वसीम सैय्यद लतीफ उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.नीता राऊत उपस्थित होत्या. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयीची कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सैय्यद वसीम सैय्यद लतीफ सर यांनी शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदाना बद्दल साजरा केला जातो. अशा प्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा. डॉ.नीता राऊत यांनी चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सम्मान आहे. समाजाचा विकास सत्तेत होत नाही.यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. अशा प्रकारचे मार्गदर्शन मॅडमनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनीषा क्षीरसागर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रिया पारधी यांनी केले. कार्यक्रमाला एकूण 40 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तेजस सर, आशिष सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Copyright ©