यवतमाळ सामाजिक

पाथ्रड देवी वर्गात शिकवताना चिमुकले घामाघूम ,अनेकांची बोबडी बंद

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी

पाथ्रड देवी वर्गात शिकवताना चिमुकले घामाघूम ,अनेकांची बोबडी बंद

शिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या चिमुकल्यांची प्रतिक्रिया

दारव्हा तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा पाथ्रड देवी येथील विद्यार्थ्यांना शिकवणं , वर्गात शिस्त राखणं , त्यांना सांभाळणं अध्यन-अध्यापनाची पूर्व तयारी करणे व प्रत्यक्ष शिकवणे , फलक-कार्य , प्रश्न निर्माण करणे व विचारणे , विद्यार्थ्यांना एखादा मुद्दा समजलं नसल्यास त्याची उजळणी करणे खरच काही सोपं काम नाही रे देवा ! ही आहे प्रतिक्रिया शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची !

पाथ्रड देवी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा आज { ता. ५ } शिक्षक दिनानिमित्त स्वयं-प्रशासन व इतर विविध उपक्रम थाटात संपन्न झाले . सकाळी संदिप खांदवे सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे इतिहास व महत्व पटवून दिले . आदर्श समाज व प्रगत देश घडविण्यात शिक्षकांच्या योगदानाबद्दल देखील त्यांनी विस्तृत माहिती दिली .

तद्नंतर चिमुकल्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना विविध विषय शिकविले . आपल्या जीवनात आदर्श असणाऱ्या गुरुजनांची हुबेहूब नक्कल करण्यासाठी अनेक विद्यार्थी सुरवातीला “उतावीळ” होते . त्यांनी अध्ययन-अध्यापनाची भरपूर तयारी देखील केली होती . मात्र प्रत्यक्ष अनुभव वेगळाच असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी शेवटी व्यक्त केली .

शिक्षकाच्या रुपात आपल्याच वर्गात प्रवेश करतांना आपल्याला हुडकी भरल्याचे अनेकांनी सांगितले . काहींची घाम पुसता-पुसता तारांबळ उडाली . अनेकांची तर वर्गात जणु बोलतीच बंद झाली . काही विद्यार्थ्यांनी शिकवण्याचं मथळा सोडून भलतंच मार्ग पकडला , तर काही जण तासिका घेतांना अनेक बाबी सपशेल विसरून गेले .

विद्यार्थ्यांना सांभाळणं , त्यांना शिकवणं,वर्गात शिस्त राखणं खरच काही सोप्पं काम नाही , हे आज आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून माहिती झाल्याची प्रतिक्रिया चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शेवटी व्यक्त केली . मात्र आज वठलेली शिक्षकाची भूमिका ही कायम स्मरणात राहील, असे देखील त्यांनी सांगितले .

स्वयं-प्रशासनाचा अनुभव आगळा-वेगळा होता व आज पुस्तकांपेक्षाही अधिक व बरंच वेगळं शिकायला मिळाल्याचे मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिक्षण अधिकारी , लिपिक , परिचर बनलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले . सर्वच चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते .

मुख्याध्यापिका रोहनकर मॅडम, गुल्हाने मॅडम, संदीप खांदवे, घोडाम सर, पारवेकर सर, आरू सर, घोगले सर, चौकडे सर, काही गावातील नागरीक उपस्थित आदींचे मार्गदर्शन त्यांना लाभले .

Copyright ©