यवतमाळ सामाजिक

भोसा (यवतमाळ) येथे बंजारा समाजाचा तिज उत्सव

भोसा (यवतमाळ) येथे बंजारा समाजाचा तिज उत्सव

यवतमाळ – श्रावणातील तिजोत्सव बंजारा लोकसंस्कृतीच दर्शन घडविणारा उत्सव आहे.यामुळे हा उत्सव बंजारा समाजात मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.यातच यवतमाळ मध्ये वास्तव्यास असणाऱ्या समाज बांधवांना दुसऱ्या तांड्याचा आधार घेवून हा उत्सव साजरा करावा लागत होता.मात्र यावर्षी भोसा परिसरात वास्तव्यास असणारे समाज बांधव एकत्र येत भोसा तांड्याची निर्मिती करून प्रथमतःच तिज पेरणी केली.

या तांड्यात बंजारा समाजाची परंपरा रितीरिवाज या बाबी पुढे ठेवून मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून नायक प्रल्हाद राठोड यांच्या तांड्यात हा उत्सव पार पडणार आहे.१ सप्टेंबर ला सुरू झालेला उत्सव १० सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.या कार्यक्रमा दरम्यान रोज रुक्मिणी नगर स्थित तांड्याचे नायक प्रल्हाद राठोड यांचे घरी गायनासह तिजोत्सव कार्यक्रम साजरे केले जात आहे.येणाऱ्या ९ सप्टेंबर ला ढंबोळी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येवून १० सप्टेंबरला यवतमाळ मधील तांडे सहभागी होवून पोस्टल ग्राऊंडवर तिज तोडणे हा कार्यक्रम सामूहिक रित्या पार पडणार असून नंतर विसर्जन होवून या कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे तांड्याचे नायक प्रल्हाद राठोड, कारभारी किशोर राठोड, डाव मनोज चव्हाण, हसाबी रमेश चव्हाण, नसाबी दिवान चव्हाण यांनी कळविले असून या उत्सवात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी होवून या उत्सवाचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले आहे.

Copyright ©