Breaking News यवतमाळ

कुसळ येथील युवकाचा धुळे जिल्ह्यात अपघातात मृत्यु

कुसळ येथील युवकाचा धुळे जिल्ह्यात अपघातात मृत्यु

डोंगरखर्डा येथुन जवळच असलेल्या कुसळ (मुसळ) येथील युवकाचा मोटर सायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे दिनांक २८ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजताचे दरम्यान घडली.

घटनेतील मृतकाचे नाव किशोर उर्फ काल्या झुंगे ( २७) रा. कुसळ (मुसळ) ता. कळंब , असुन तो धुळे जिल्ह्यात आपल्या उदरनिरवाहासाठी फुटाणे विक्रीचा धंदा करण्यासाठी तेथे राहत होता,

आपल्या एम. एच.२९ए.झेड,६४१०क्रमांकाच्या दुचाकी (शाईन)गाडीने पिंपळनेर येथे जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत तो गंभीर जख्मी झाला,

घटनेची माहिती कळताच त्याला रुग्णालयात नेण्यात आले दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती कुसळ गावी कळताच नातेवाईकांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतला असुन दिनांक ३०ऑगस्ट रोजी स्वगावी कुसळ येथे अंत्यविधी होणार आहे.

भटक्या सरोदी समाजामधी अत्यंत मनमिळावू स्वभाव म्हणुन ओळखीस असलेला किशोर निघुन गेल्याने कुसळ गावात सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले होते.

Copyright ©