यवतमाळ राजकीय

रस्त्यांच्या दुरावस्थेला जवाबदार दोषीं कंत्राटदार व अधिकाऱ्यानवर कार्यवाही करण्याची मागणी

रस्त्यांच्या दुरावस्थेला जवाबदार दोषीं कंत्राटदार व अधिकाऱ्यानवर कार्यवाही करण्याची मागणी

यवतमाळ जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दळण वळणाचे रस्ते हे एक मेव माध्यम आहे, अश्यातच यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे एकाच रस्त्याचे काम वारंवार करण्यात येते तरी देखील ग्रामीण भातील एकागावावरून दुसऱ्या गावाला जोडणारेर रस्ते आणि गावतील अंतर्गत रस्ते खराब आहेत ग्रामीण भागातील नागरिक या रस्तानी जाताना मरणयातना भोगत आहेत गरोधर स्त्रिया , ग्रामीण भागातील रुग्ण यांनातर अतोनात त्रास सहन करावा लागत आहे आणि निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार आणि कमिशन घेऊन सर्व माहित असून शांत राहणारे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अधिकारी मजा मारत आहेत या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्तेला खरे जवाबदार हेच लोक आहेत तरी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून निवेदनातून आपण स्वतः ग्रामीण भागातील रस्त्यांची पाहणी करावी किवा आम्ही सत्यपरिस्थिती आपणा समोर आणतो आणि ही सर्व परिस्थिती पहिल्या नंतर आपल्या लक्षात येईलच की खरी परिस्तिती काय आहे आणि मग अश्या दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यांवी या आशयाचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिरामवार , शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमित बदनोरे , अभिजित नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना यवतमाळ , गौरव दरने मनविसे कळंब ,यवतमाळ शहर उपाध्यक्ष प्रथमेश पाटील , शहर सचिव तुषार चौडके , विभाग अध्यक्ष ओम् राठोड , यश शृंगारे , अमितेश आडे , राहुल चिंचोळकर , अंजेष कालंकार यांच्या सह यवतमाळ शहरातील व तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

Copyright ©