यवतमाळ शैक्षणिक

भारती महाविद्याल येथे राखी प्रदर्शनी व राखी विक्री संपन्न

भारती महाविद्याल येथे राखी प्रदर्शनी व राखी विक्री संपन्न

स्थानिक स्व. राजकमलजी भारती कला वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय येथे गृहअर्थशास्त्र विभागा अंतर्गत रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींनी बनविलेल्या विविध कलात्मक व आकर्षक राख्यांच्या प्रदर्शनीचे व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.ए.पिस्तूलकर उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.एस. व्ही वानखडे सर उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ. रूपाली टेकाडे व प्रा. स्वाती मनवर उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. ए. पिस्तुलकर यांनी स्वयंरोजगाराच्या प्रेरणेतून छोटा व्यवसाय सुरू करून जास्त उत्पन्न मिळविणे, आपल्या उद्योजकतेचा विकास करणे, स्वयंरोजगारातून आपले कला,कौशल्य,कल्पकता, संधी कशाप्रकारे आत्मसात करता येईल या विषयावर सरांनी विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. एस. व्ही. वानखेडे यांनी ‘कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करीत असतांना आपल्यामधील कलागुणांचा विकास करून त्याचे रूपांतर स्वयंरोजगारामध्ये कशा पद्धतीने करता येतील हे विविध उदाहरणांद्वारे सरांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले . तर कार्यक्रमाच्या परीक्षक डॉ. रूपाली टेकाडे यांनी विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्यांचे परीक्षण केले व विद्यार्थिनींचे कौतुक केले. विद्यार्थिनींच्या राखी विक्रीकरिता महाविद्यालयामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैष्णवी चव्हाण ( बी.ए. भाग एक ) तर आभार प्रदर्शन कु. तनवी पिसे ( बी.ए.भाग एक )यांनी केले. कार्यक्रमाला एकूण 40 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Copyright ©