यवतमाळ

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या महत्त्व बाबत कृषी करण्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या महत्त्व बाबत कृषी करण्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

माती विना शेती (हायड्रोपोनिक्स)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय, kmयवतमाळ येथील विद्यार्थिनींनी बरबडा ता. यवतमाळ ,जि. यवतमाळ येथे हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मितीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले.

या अनुषंगाने तनया दरणे,योगेश्वरी डोंगरकर, साक्षी जेनेकर,अर्पिता खिरटकर ,साक्षी नांदेकर या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती कशी करावी याबद्दल माहिती दिली. हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू ,बाजरी, ज्वारी ,बार्ली या पिकांपासून अंकुरण करून स्वस्त दरात पौष्टिक हिरवा चारा निर्माण करणे. यामध्ये प्रकाश, तापमान आणि पाण्याची नियंत्रण करून जास्तीत जास्त हिरवा चारा उत्पादन घेतले जाते. एक किलो धान्यांपासून किमान ७ ते ८किलो हिरवा चारा तयार होतो, चाऱ्यांची ७ ते ८ दिवसात २० ते २५ सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना १२ महिने दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे ही समस्या ठरू लागली आहे.

पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो, हा चारा दुगधत्या जनावरांसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. या चाऱ्यामुळे जनावरांची पचनक्रिया सुधारते ,रोगप्रतिकारक क्षमता वाढते, तसेच दुधाच्या फॅटमध्ये वाढ किमान अर्धा लिटर दुधात वाढ होते,जनावरांच्या शरीरात प्रधिन खनिजे ,जीवन महत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ होते .चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे. ट्रेमध्ये पाण्याचा वापर करून चारा घेणे शक्य असल्यामुळे दुष्काळग्रस्त भागांमध्ये अशा प्रकारे चारा निर्मिती करणे शक्य आहे अशी माहिती विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना दिली.

याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.आर.ए .ठाकरे ,उपप्राचार्य एम .व्हि.कडू, विषय तज्ञ प्राचार्य एस.पी. लोखंडे आणि कार्यक्रमाधिकारी एस.व्ही.महानुर या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी भोला देसाई,समीर येरेकर, चंद्रकुमार बनसे, रोहितराव दुधे, विनोद शेंबडे, पंकज शेंडे, कैलास देसाई आदी. शेतकरी उपस्थित होते.

Copyright ©